भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या रांचीतील राहत्या घरावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
पावसाचा खो!
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानचा चौथा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यांनतर रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी धोनीच्या घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवतहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळस धोनीसह त्याचे कुटुंबीय घरामध्ये नव्हते. धोनी कुटुंब सामना पाहण्यासाठी मैदानावर गेले होते.
रांची पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धोनीच्या कुटुंबीयांनी सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर धोनीच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याआधीही अशाच दगडफेकीचा प्रकार धोनीच्या घरावर झालेला आहे. याची पुन्हा पुनरावृत्ती झाल्याने धोनीनेही नाराजी व्यक्त केली आहे. 

Story img Loader