देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या खेळाडूंना आयपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावात चांगला भाव मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे खेळाडू देशासाठी खेळले नसले तरी त्यांची अन्य स्पर्धामधील कामगिरी लक्षणीय असून उन्मुक्त चंद, रिषी धवनसारख्या उदयोन्मुख खेळाडूंना यंदाच्या लिलावात जास्त मागणी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलचा सातव्या हंगामासाठीचा लिलाव बंगळुरूमध्ये १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार असून यामध्ये देशाचे प्रतिनिधित्व न केलेल्या ६५१ खेळाडूंची  यादी असणार आहे. यामध्ये मनीष पांडे, रजत भाटिया, इक्बाल अब्दुल्ला, टी. सुमन अशा युवा खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये १२७ खेळाडूंनी यापूर्वी आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले असून अन्य खेळाडू नवखे आहेत.

Story img Loader