UP Warriorz Women vs Delhi Capitals Women Highlights : महिला प्रीमियर लीग २०२५ मधील सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिल्सने यूपी वॉरियर्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीने शेवटच्या काही षटकात अॅनाबेल सदरलँड आणि मरिझाना कापच्या फटकेबाजीच्या जोरावर सामन्यात बाजी मारली. या विजयासह दिल्लीने तीन सामन्यात दुसरा विजय नोंदवला. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ६९ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात यूपीची सुरुवात चांगली झाली. किरण नवगिरे आणि दिनेश वृंदा यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली, जी सदरलँडने मोडली. तिने २३ वर्षीय वृंदाला जेमिमा रॉड्रिग्जकडून झेलबाद केले. १५ चेंडूत १६ धावा करून ती बाद झाली. त्याच वेळी, किरणने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५१ धावांची दमदार खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिलाही सदरलँडने ७३ धावांवर बाद केले. ज्यामुळे यूपीला ७ बाद १६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात दिल्लीने कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.५ षटकांत ३ गडी गमावून विजय मिळवला.

Live Updates

UP-W vs DC-W Highlights : महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात आतापर्यंत यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांत पाच सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दिल्लीने ४ आणि यूपीने एक जिंकला आहे.

23:00 (IST) 19 Feb 2025
UPW vs DC Live : सदरलँड-कापच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने मारली बाजी

महिला प्रीमियर लीग २०२५ मधील सहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिल्सने यूपी वॉरियर्सचा ७ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीने शेवटच्या काही षटकात अॅनाबेल सदरलँड आणि मरिझाना कापच्या फटकेबाजीच्या जोरावर सामन्यात बाजी मारली. या विजयासह दिल्लीने तीन सामन्यात दुसरा विजय नोंदवला दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ६९ धावांचे योगदान दिले.

या सामन्यात यूपीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना किरण नवगिरेच्या अर्धशतकाच्या जोरावर सात बाद १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने १९.५ षटकांत ३ गडी गमावून १६७ धावा करत दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

22:40 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : १८ षटकांत दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या १४५/३ धावा

१८ षटकांत दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या १४५/३ आहे. मारियान कॅप १९ धावा काढून खेळत आहे आणि अ‍ॅनाबेल सदरलँड २९ धावा काढून खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सला १२ चेंडूत ११ प्रति षटकाच्या वेगाने २२ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ८.२ आहे.

22:28 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधार मेग लॅनिंग ६९ धावा काढून बाद

दिल्ली कॅपिटल्सला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कर्णधार मेग लॅनिंग ६९ धावांवर बाद झाली. तिला ग्रेस हॅरीने बाद केले. आता १५ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर १२०/३ धावा आहे. मारियान कॅप १ धावांवर आणि अ‍ॅनाबेल सदरलँड २२ धावांवर खेळत आहेत.

22:23 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने १३ षटकांत ११०/२ धावा केल्या

दिल्ली कॅपिटल्सने १३ षटकांत ११०/२ धावा केल्या. मेग लॅनिंग ६५ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि अ‍ॅनाबेल सदरलँड १७ धावा काढल्यानंतर खेळत आहे.

22:14 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : कर्णधार मेग लॅनिंगने ३४ चेंडूत झळकावले अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने ३४ चेंडूत अर्धशतक झळकावले .११ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर ९३/२ आहे. मेग लॅनिंग ५६ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि अ‍ॅनाबेल सदरलँड १० धावा काढल्यानंतर खेळत आहे.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1892253720999842140

22:08 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का बसला आहे. जेमिमा रॉड्रिग्जला खातेही उघडता आले नाही. ९ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर ७४/२ धावा आहे. अ‍ॅनाबेल सदरलँड २ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि मेग लॅनिंग ४५ धावा काढल्यानंतर खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सला ६६ चेंडूत ८.४५ प्रति षटकाच्या वेगाने ९३ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ८.४५ आहे.

21:58 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, शफाली वर्मा २६ धावांवर बाद

दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का बसला आहे. स्फोटक फलंदाज शफाली वर्मा २६ धावा काढून बाद झाली. दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का बसला आहे. स्फोटक फलंदाज शफाली वर्मा २६ धावा काढून बाद झाली. ७ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर ६५/१ धावा आहे. जेमिमा रॉड्रिग्ज शून्य धावांवर आणि मेग लॅनिंग ३८ धावांवर खेळत आहेत.

21:46 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : ५ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर ५०/० धावा

५ षटकांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्कोअर ५०/० धावा आहे. मेग लॅनिंग २७ धावांवर आहे आणि शफाली वर्मा २२ धावा काढल्यानंतर खेळत आहे.

21:38 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सची आक्रमक सुरुवात, दोन षटकांत पाडला धावांचा पाऊस

यूपी वॉरियर्सच्या १६७ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली आहे. दिल्लीने २ षटकांनंतर धावसंख्या बिनबाद २० धावा आहे. मेग लॅनिंग ९ आणि शेफाली वर्मा ११ धावांवर खेळत आहे.

21:13 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवले १६७ धावांचे लक्ष्य

यूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना किरण नवगिरेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर ७ गडी गमावून १६७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यूपीसाठी किरण नवगिरेने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून सदरलँडने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

20:59 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : १९ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर १६२/५ धावा

१९ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर १६२/५ धावा आहे. सिनेले हेन्री ३१ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि श्वेता सेहरावत ३७ धावा काढल्यानंतर खेळत आहे.

20:53 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : १७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर १५०/५ धावा

१७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर १५०/५ धावा आहे. सिनेले हेन्री २६ धावांवर खेळत आहे आणि श्वेता सेहरावत ३० धावांवर खेळत आहे.

20:42 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सने ११८ धावांवर निम्मा संघ गमावला

यूपी वॉरियर्सने ११८ धावांवर निम्मा संघ गमावला आहे. ग्रेस हॅरिस १२ धावांवर झेलबाद झाली. १५ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ११८/५ धावा आहे. ग्रेस हॅरिस १२ धावांवर आणि श्वेता सेहरावत २४ धावांवर खेळत आहे.

20:31 (IST) 19 Feb 2025
UPW vs DC Live : १३ षटकानंतर यूपी वॉरियर्सची धावसंख्या १०३/४ धावा

१३ षटकांत यूपी वॉरियर्सची धावसंख्या १०३/४ धावा आहे. श्वेता सेहरावत ११ धावा काढून खेळत आहे आणि ग्रेस हॅरिस ११ धावा काढून खेळत आहे.

20:26 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सला चौथा धक्का बसला

यूपी वॉरियर्सला चौथा धक्का बसला! कर्णधार दीप्ती शर्मा ७ धावांवर बाद झाली. तिला मिनू मनीने बाद केले. ११ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ८७/४ आहे. श्वेता सेहरावत ३ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि ग्रेस हॅरिस ३ धावांवर खेळत आहे.

20:19 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सला तिसरा धक्का बसला

यूपी वॉरियर्सला तिसरा धक्का बसला आहे. ताहलिया मॅकग्रा एक धाव काढून बाद झाली. ९ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ७६/३ आहे. श्वेता सेहरावत शून्य धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि दीप्ती शर्मा २ धावा काढल्यानंतर खेळत आहे.

20:11 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सला मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर तंबूत परतले

यूपी वॉरियर्सला मोठा धक्का बसला आहे. कारण दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. किरण नवगिरे (५१) अर्धशतक झळकावून बाद झाली. ८ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा धावसंख्या ७५/२ धावा आहे. टहलिया मॅकग्रा १ धावांवर आणि दीप्ती शर्मा १ धावांवर खेळत आहे.

19:59 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सला दमदार सुरुवातीनंतर पहिला धक्का! वृंद्धा दिनेश १६ धावांवर झेलबाद

यूपी वॉरियर्सला दमदार सुरुवातीनंतर वृंद्धा दिनेशच्या रुपाने पहिला धक्का बसला. ती १६ धावांवर झेलबाद झाली. आता ६ षटकांनंतर यूपी वॉरियर्सची धावासंख्या ६६/१ धावा आहे. दीप्ती शर्मा फलंदाजीला आली आआहे आणि किरण नवगिरे ४४ धावा धावांवर खेळत आहे.

19:48 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : ४ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा धावसंख्या ४९/० धावा

४ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा धावसंख्या ४९/० धावा आहे. वृंदा दिनेश ८ धावांव आणि किरण नवगिरे ३६ धावांवर खेळत आहे.

19:42 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : यूपी वॉरियर्सची दमदार सुरुवात! दोन षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद २६ धावा

यूपी वॉरियर्सच्या डावाला किरण नवगिरे आणि वृंद्धा दिनेशने दमदार सुरुवात केली आहे. ज्यामुळे दोन षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद २६ धावा आहे. किरण नवगिरे (१९) आणि वृंद्धा दिनेश (२) धावांवर खेळत आहेत.

19:12 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, वृंदा दिनेश, उमा छेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अ‍ॅनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), जेस जोनासेन, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी

19:10 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

महिला प्रीमियर लीग, २०२५ चा सहावा सामना यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले

18:57 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live : या खेळाडूंवर असणार विशेष नजर

या खेळाडूंवर असणार विशेष नजर

२०२३ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघातून वगळण्यात आले असले तरी, शिखा पांडेने जगभरातील टी-२० लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. डब्ल्यूपीएल २०२४ नंतर, तिने महिला कॅरिबियन प्रीमियर लीग, महिला बिग बॅश लीग आणि महिला सुपर स्मॅशमध्ये भाग घेतला, जिथे तिने एकूण २५ विकेट्स घेतल्या. तिने डब्ल्यूपीएल २०२५ ची सुरुवात चांगली केली. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर रन रेट ९ च्या जवळ असतानाही आरसीबीविरुद्ध ६.७५ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. आतापर्यंत, ती डब्ल्यूपीएव २०२५ मध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जबरदस्त गोलंदाज आहे.

18:33 (IST) 19 Feb 2025

UPW vs DC Live Updates : मधल्या फळीतील खेळाडू विजय आणि पराभव निश्चित करु शकतात

मधल्या फळीतील खेळाडू विजय आणि पराभव निश्चित करु शकतात –

दिल्ली कॅपिटल्स (डीसी) कडे डब्ल्यूपीएलमध्ये सर्वात यशस्वी सलामी जोडी आहे, त्यांच्या मधल्या फळीवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात टीका झालेली नाही. पण आता तसे राहिले नाही कारण त्यांनी हंगामातील पहिला सामना जवळजवळ गमावला होता आणि नंतर आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. डीसीच्या मधल्या फळीची (क्रमांक ४ ते ७) सरासरी २१.९७ आहे, जी डब्ल्यूपीएल मधील सर्वात कमी आहे. या स्थानावर जेस जोहानासन (१३), मॅरिझाने कॅप (१२) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (१२) यांनी सर्वाधिक डाव खेळले आहेत.

18:28 (IST) 19 Feb 2025

UP vs DC Live Updates : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स हेड टू हेड रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स हेड टू हेड रेकॉर्ड –

महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स संघ एकूण ४ वेळा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध तीन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे.

18:19 (IST) 19 Feb 2025

UP vs DC Live Match Updates : यूपी आणि दिल्ली दोघांनाही विजय आवश्यक

यूपी आणि दिल्ली दोघांनाही विजय आवश्यक

दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स या दोघांनीही या मैदानावर त्यांचा शेवटचा सामना खेळला होता. दिल्लीचा सामना आरसीबीशी झाला तर उत्तर प्रदेशचा सामना गुजरातशी झाला. मात्र, वडोदराच्या या कोटाम्बी क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली आणि उत्तर प्रदेश संघांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की दोन्ही संघ जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणार आहेत.

WPL 2025 UP vs DC Match Highlights : डब्ल्यूपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहे. सहावा आज दिल्ली आणि यूपी संघात खेळला गेला. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारल्याने यूपील अजूनही विजयाचे खाते उघडता आले नाही.