ICC Cricket World Cup 2023 Trophy Tour: आयसीसीने जूनच्या सुरुवातीला क्रिकेट विश्वचषक २०२३ ट्रॉफीचे अनावरण काहीशा आश्चर्यकारक पद्धतीने केले, त्या ट्रॉफीला स्ट्रॅटोस्फियरमध्ये लॉन्च केले, तिथून ती ट्रॉफी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरेल, जिथे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे की लेहमधील नयनरम्य पॅंगॉन्ग तलावातून ट्रॉफीचा दौरा अधिकृतपणे सुरू झाला आहे. त्यांनी ट्वीटरवर ट्वीट करून फोटो केले शेअर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण एका अनोख्या पद्धतीने केले गेले होते. पृथ्वीपासून १.२० लाख फूट उंचीवर असलेल्या स्पेस स्ट्रॅटोस्फियरमध्ये त्याचे अनावरण करण्यात आले. त्या उंचीवर उणे ६५ अंश तापमान असते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने माहिती दिली की प्रतिष्ठित ट्रॉफी बेस्पोक स्ट्रॅटोस्फेरिक बलूनद्वारे अंतराळात पाठवण्यात आली आणि त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर धमाकेदार लँडिंग केले. या ऐतिहासिक प्रक्षेपण आणि लँडिंग दरम्यान, ४००० कॅमेर्यांनी पृथ्वीच्या वातावरणाच्या काठावरून एकदिवसीय (ODI) विश्वचषक ट्रॉफीचे काही अप्रतिम शॉट्स, टिपले, जे पाहण्यास चाहते गर्दी करत आहेत. एक अतिशय सुंदर व्हिडिओ देखील त्यात आला प्रसिद्ध करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
विश्वचषक ट्रॉफीचा दौऱ्याला २७ जूनपासून सुरू होत आहे आणि ट्रॉफी कुवेत, बहरीन, मलेशिया, यू.एस.ए., नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आणि यजमान भारतासह जगभरातील १८ देशांमध्ये प्रवास करेल. या दौऱ्याच्या माध्यमातून लाखो क्रिकेट चाहत्यांना विविध उपक्रमांद्वारे या झगमगत्या ट्रॉफीला न्याहाळता येणार आहे.
जय शहा आणि झका अश्रफ यांच्यात विश्वचषक सहभागावर चर्चा होणार का?
पाकिस्तानचा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाण्याबाबत जय शाह आणि झका अश्रफ यांच्यात चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच, जर पाकिस्तानने संपूर्ण आशिया चषकाचे आयोजन केले नाही, तर पाकिस्तानचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही, असेही बोलले जात आहे. आशिया चषकाचे सर्व सामने पाकिस्तानात खेळवले जातील, असा विश्वास पाकिस्तानला आहे. मात्र, यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेल सुचवले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या यजमानपदावर एकमत झाले. त्याचवेळी, आता इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी म्हणाले की, “जर भारतीय संघ आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानी संघ २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. भारताचा विश्वचषकातील सामना १५ ऑक्टोबरला आहे.”