RCB vs UPW Super Over Thriller Highlights in Mararthi: युपी वॉरियर्जचा संघ वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिल्याच सुपर ओव्हरमध्ये विजयी ठरणारा पहिला संघ ठरला आहे. युपीच्या संघाने सुपर ओव्हरच्या थरारक सामन्यात आरसीबीचा त्यांच्या घरच्या मैदानावरच पराभव केला आहे. युपी वॉरियर्जच्या या ऐतिहासिक विजयाची स्टार सॉफी एकलस्टन ठरली आहे. जी टी-२० आणि वनडेमधील जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज आहे. सॉफी एकलस्टनने या सामन्यात फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.
RCB vs UPW: WPL च्या इतिहासातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
आरसीबी वि. युपी वॉरियर्ज यांच्या सामन्यात वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यासह या सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये युपी वॉरियर्जकडून चिनेल हेनरी आणि ग्रेस हॅरिसची जोडी मैदानात आली होती, तर आरसीबीकडून किम गार्थच्या हातात चेंडू होता. पहिल्या दोन चेंडूवर हेनरीने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही चेंडूंवर २-२ धावा मिळाल्या. यानंतर एक वाईड चेंडू तर तिसऱ्या चेंडूवर हेनरी झेलबाद झाली. यानंतर डॉट बॉल पुन्हा एक वाईड चेंडू आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत युपीने एकूण ८ धावा केल्या. यासह आरसीबीला विजयासाठी एका षटकात ९ धावांचे योगदान दिले.
आरसीबीचा संघ ९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात अपयशी ठरला. आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधना आणि रिचा घोषची जोडी मैदानात उतरली होती. तर युपीकडून पांढऱ्या चेंडूची जगातील नंबर वन गोलंदाज सोफी एकलस्टन गोलंदाजी करत होती. सोफीच्या भेदक गोलंदाजीच्या पुढे आरसीबीच्या दोन्ही फलंदाज फेल ठरल्या. आरसीबीचा संघ फक्त ४ धावा करू शकला. यासह युपीने दणदणीत विजय मिळवला.
RCB vs UPW: अखरेच्या षटकात नेमकं काय घडलं?
आरसीबी वि. युपी वॉरियर्जच्या सामन्यातील अखेरच्या षटकात युपीला विजयासाठी ६ चेंडूत १८ धावांची गरज होती तर आरसीबीला विजयासाठी एका विकेटची गरज होती. चेंडू अनुभवी रेणुका ठाकूरच्या हातात चेंडू होता. तर युपीकडून सोफी एकलस्टनने या सामन्यात दोन षटकार आणि एक चौकार लगावत १६ धावा केल्या. तर पाचव्या चेंडूवर १ धाव घेतली आणि अखेरच्या चेंडूवर एकलस्टन धावबाद झाली. यासह सामना बरोबरीत सुटला आणि WPL च्या इतिहासातील पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
अखेरचं षटक
युपीला विजयासाठी ६ चेंडूत १८ धावांची गरज
पहिला चेंडू – निर्धाव
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू – चौकार
पाचवा चेंडू – एक धाव
सहावा चेंडू – धावबाद
यूपी वॉरियर्जने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण एलिस पेरीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अप्रतिम खेळी खेळली, ज्यामुळे आरसीबी संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १८० धावा केल्या. पेरीने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ९० धावा केल्या. तिच्याशिवाय डॅनी व्याटनेही ५७ धावांचे योगदान दिले. पेरीने डॅनी व्याटसह अर्धशतकी भागीदारीही केली.
दुसरीकडे, यूपी वॉरियर्जला देखील २० षटकांत केवळ १८० धावा करता आल्या आणि संघ अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सर्वबाद झाले. यादरम्यान श्वेता सेहरावतने ३१ धावा, दीप्ती शर्माने २५ धावा आणि सोफी एकलस्टनने नाबाद ३३ धावा केल्या. शेवटच्या षटकात यूपीला विजयासाठी १८ धावांची गरज होती. या षटकात सोफी एकलस्टनने २ षटकार आणि १ चौकार मारून सामना रोमांचक वळणावर आणला. पण शेवटच्या चेंडूवर संघाला विजयासाठी १ धाव हवी होती आणि क्रांती गौर स्ट्राईकवर होती. ती हा चेंडू खेळण्यासाठी चुकली आणि सोफी एकलस्टन धावबाद झाली, त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.