शार्लोट (अमेरिका) : उरुग्वेने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कॅनडाचे आव्हान शूटआऊटमध्ये ४-३ असे परतवून लावत तिसरे स्थान मिळवले. भरपाई वेळेत बरोबरी आणि अखेरची पेनल्टी मारणाऱ्या लुईस सुआरेझची कामगिरी संघासाठी निर्णायक ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या ३७व्या वर्षीही आपल्याकडे अजूनही पहिल्यासारख्या ऊर्जेने खेळण्याची कुवत असल्याचे दाखवून देणाऱ्या सुआरेझच्या भरपाई वेळेतील गोलने उरुग्वेने सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर शूटआऊटमध्ये गोलरक्षक सर्जिओ रोशेटने इस्माईल कोनेची कमकुवत किक अडवली. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात अल्फोन्सो डेव्हिसची किक क्रॉसबारला धडकली आणि उरुग्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

हेही वाचा >>> Sanju Samson : सॅमसनने ११० मीटरचा षटकार ठोकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

शूटआऊटमध्ये फेडेरिको व्हॅल्व्हर्डे, रॉड्रिगो बेंटनकूर, जॉर्जियन डी अरासकाएटा आणि सुआरेझ यांनी शूटआऊटमध्ये आपले लक्ष्य अचूक साधले. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिड, मोईस बॉम्बिटो आणि मॅथ्यू चोईनिएर यांनाच लक्ष्य साधता आले. उरुग्वे या स्पर्धेतील तीन सर्वोत्तम संघांपैकी एक होता. आम्ही तिसरे स्थान पटकावून हे सिद्ध केले असे प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा यांनी म्हटले असले, तरी ते संघाच्या कामगिरीवर समाधानी नव्हते. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेळात सुधारणा अपेक्षित होती. खरे तर सामना आम्ही निर्णायक वेळेत संपवायला हवा होता, असे ते म्हणाले.

सामन्याच्या भरपाई वेळेत ९२व्या मिनिटाला मध्यातून जोस मारिया गिमेनेझच्या पासवर सुआरेझने ज्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे प्रदर्शन करून गोल केला, त्याला तोड नाही, अशा शब्दात बिएल्सा यांनी सुआरेझच्या खेळाचे कौतुक केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uruguay take third place at copa america beats canada zws
Show comments