मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौताला वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी ऋषभ पंत आणि तिच्यातला वाद चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर आता या अभिनेत्रीचे नाव पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशी रौतेला आणि नसीम शाह यांना घेऊन वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा >>> उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी तिला…”

“काही दिवसांपूर्वी माझ्या सोशल मीडिया टीमने काही एडिटेड व्हिडीओ शेअर केले. माझ्या चाहत्यांनी तयार केलेले हे व्डिडीओ होते. या व्हिडीओमध्ये अन्य काही लोकांचा समावेश होता, याची माझ्या टीमला कल्पना नव्हती. त्यामुळे गैरसमज पसरवू नये,” असे उर्वशी रौतेला म्हणाली आहे.

हेही वाचा >>> Video : पाकिस्तानच्या खेळाडूने हे काय केलं ? प्रेक्षकांचे मोबाईल थेट खिशात घातले; पाहा नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर तिचे नाव नसीम शाहसोबत जोडले जात आहे. ४ सप्टेंबर रोजी ती भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहायला गेली होती. याच सामन्यातील व्हिडीओ तिने इन्साटाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये नसीम शाह हसताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उर्वशीदेखील स्टेडियममध्ये बसून हसत आहे. एका फॅन पेजने बनवलेला व्हिडीओ उर्वशीने इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून पोस्ट केला होता. याआधी भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतसोबतच्या वादामुळेही उर्वशी चर्चेत आली होती. या दोघांच्या वादाचा संदर्भ घेऊन सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स मोठ्या चवीने शेअर केले गेले होते.

हेही वाचा >>> पाकिस्तान-श्रीलंका अंतिम लढतीत कोण बाजी मारणार? ‘ही’ बाब ठरणार महत्त्वपूर्ण; भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने केले भाकीत

नसीम शाह काय म्हणाला होता?

नसीम शाहला उर्वशी रौतेलाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना “उर्वशी रौतेला कोण आहे, हे मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते याबाबत मला काहीही माहिती. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे,” असे नसीम शाह म्हणाला होता.