भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत आणि बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यादरम्यानचा वाद सर्वांनाच माहीत आहेत. दोघांनी इन्स्टा स्टोरीमधून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे खूप टीका केली. दोघांचा वाद चांगलाच चर्चेत राहिला. आता उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ऋषभचे नाव आल्यावर ‘मला माफ करा’ असं म्हणताना दिसत आहे.

इन्स्टंट बॉलिवूडने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतबद्दल वक्तव्य केलंय आहे. “आरपीसाठी तुझ्याकडून (ऋषभ पंत) काही मेसेज आहे का, तू गोष्ट जरा फिरवत आहे, त्यामुळे मी तुला थेट विचारतोय? असा प्रश्न तिला विचारला. यावर उर्वशी म्हणाली, “सिधी बात नो बकवास, म्हणून मी बकवास करत नाहीये.” तिला पुढे विचारण्यात आलं की, “काही मेसेज आहे का? तू म्हणालीस माफ करा आणि विसरा. त्यामुळे तुला आमच्या माध्यमातून ऋषभपर्यंत कोणता मेसेज पाठवायचा आहे का? यावर  उर्वशी म्हणाली, “मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की… काही नाही माफ करा, मला माफ करा.” यादरम्यान उर्वशीने हातदेखील जोडले.

गेल्या महिन्यात उर्वशीने एका मुलाखतीत दावा केला होता की, आरपी नावाची व्यक्ती एकदा त्याला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबली होती. यानंतर पंतने उर्वशीचे नाव न घेता इन्स्टाग्रामवर निशाणा साधला होता. नंतर दोघांनीही एकमेकांची नावं न घेता बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या.

Bigg Bossचे घर कुठे आहे? त्याची किंमत किती आणि मालकी कुणाची? जाणून घ्या

उर्वशी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की, “मी नवी दिल्लीत शूटिंग करत होते आणि रात्री पोहोचले. मला पटकन तयार व्हावं लागलं, कारण अभिनेत्रींना तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो. तेव्हा मिस्टर आरपी हॉटेलच्या लॉबीत आले आणि त्यांना मला भेटायचं होतं. पण दहा तास झाले आणि मी झोपी गेले. मला कोणाचाही कॉल उचलता आला नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला १६-१७ मिस्ड कॉल दिसले. मला वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत आहे आणि मी त्याला भेटू शकत नाही. त्यानंतर मी त्याला म्हटलं  की तू मुंबईला आल्यावर आपण भेटू. नंतर आम्ही मुंबईत भेटलो, पण तिथं खूप मोठा गोंधळ झाला.”

राखीने बोल्ड ड्रेस घातलेलं बॉयफ्रेंडला आवडत नाही; अभिनेत्री म्हणाली, “मी बुरखा…”

उर्वशीचं वक्तव्य चर्चेत येताच ऋषभने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, “किती विचित्र आहे की लोक लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी मुलाखतींमध्ये खोटं बोलतात. प्रसिद्धी आणि नाव कमवण्यासाठी हपापलेले लोक आहेत, ही दुःखाची बाब आहे. देव त्यांचं भलं करो.” नंतर त्याने ती पोस्ट डिलीट केली. यानंतर “छोटू भैय्याने बॅट बॉल खेळायला हवं. मी मुन्नी नाहीये जी तुझ्यासाठी बदनाम होईल यंग किड्डो डार्लिंग,” अशी पोस्ट टाकत उर्वशीने पंतवर निशाणा साधला होता.