Asia Cup 2022 IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सहभागी होऊ न शकलेल्या ऋषभ पंतला यावेळेस मात्र टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये हक्काचं स्थान मिळालं होतं. रोहित शर्मा व के एल राहुल स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यावर ऋषभ पंत मैदानावर उतरला. विराट कोहलीला साथ देत ऋषभ पंतने १४ धावा केल्या आणि मग आसिफ अलीच्या हातून झेलबाद होत पंत सुद्धा पॅव्हेलियन मध्ये परतला. यादरम्यान योगायोग म्हणावा तर नेमकं याच वेळी स्टेडियममध्ये उर्वशी रौतेला दिसून आली. मग काय यावरून थेट ट्विटरवर मीम्सचा वर्षावच सुरु झाला.

ऋषभ आणि उर्वशीचा वाद ट्विटर, इंस्टाग्रामसह सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. मागच्या सामन्याच्या वेळी जेव्हा उर्वशी स्टेडियममध्ये दिसली होती तेव्हा सुद्धा पंतच्या चाहत्यांनी तिला बरेच ट्रोल केले होते. आणि आता यावेळी तर काय उर्वशी दिसताच तिकडे ऋषभ पंतची झेलबाद झाल्याने ट्रोलरना आयती संधीच मिळाली आहे.

उर्वशी रौतेला मीम्स

उर्वशी आणि ऋषभचं काय बिनसलंय?

क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला या दोघांनी एकमेकांची थेट नावं न घेता अनेक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केल्या. ‘आरपी’ नावाचा क्रिकेटपटू मला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तासनतास थांबायचा, असा दावा उर्वशीने केला आणि इथूनच उर्वशी-ऋषभ यांच्यामधील वादाला सुरुवात झाली. यावर ऋषभने प्रतिक्रिया देत मेरा पिछा छोडो बेहेन अशी पोस्ट केली होती. भारताच्या अनेक सामान्यांना उर्वशी हजेरी लावत असते आणि दरवेळेस तिला ट्रोल करण्याचे विविध मार्ग ट्रोलर्स सुद्धा शोधून काढत असतात.

Story img Loader