Urvil Patel smashes fastest T20 hundred in Just 28 Balls: आयपीएल महालिलावात ऋषभ पंत २७ कोटींच्या किमतीसह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडे ठरला. पण या लिलावात अनेक भारतीय अनकॅप्ड खेळाडू अनसोल्ड राहिले. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडे चांगली कामगिरी केली होती, त्या खेळाडूंसाठीही संघांनी बोली लावली नाही. आता लिलाव झाल्यानंतर उर्विल पटेल याने सर्वात जलद टी-२० शतक झळकावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या उर्विल पटेलने अवघ्या २८ चेंडूत टी-२० मध्ये शतक झळकावले आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा सहा वर्षे जुना विक्रम बुधवारी मोडला. पंतने २०१८ मध्ये ३२ चेंडूत टी-२० शतक झळकावले होते, जे आतापर्यंतचे भारतातील सर्वात वेगवान शतक होते, परंतु हा विक्रम गुजरातच्या उर्विन पटेलने मोडला. महालिलावानंतर दोन दिवसांनी उर्विलने हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

उर्विल देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळतो. त्याने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध शतक झळकावले. त्याने २८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत १२ षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. ३२२.८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने ३५ चेंडूत ११३ धावा केल्या.

उर्विल पटेल सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

उर्विल पटेल हा सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने या शतकासह ऋषभ पंतचा विक्रम मोडला आहे. २०१८ मधील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत हिमाचल प्रदेशविरूद्ध ३२ चेंडूत शतक झळकावलं होतं. उर्विलने जर २७ चेंडूत शतक पूर्ण केलं असतं तर तो टी-२० मधील जगातील सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला असता. हा विक्रम सध्या इस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे, ज्याने यावर्षी २७ चेंडूत शतक झळकावले.

हेही वाचा – MI IPL 2025 Full Squad: मुंबई इंडियन्सचा संघ लिलावानंतर कसा आहे? अर्जुन तेंडुलकर, बोल्ट, सँटनर विल जॅक्स…

T20 मध्ये सर्वात वेगवान शतक करणारे फलंदाज

२७ चेंडू – साहिल चौहान – एस्टोनिया विरुद्ध सायप्रस, २०२४
२८ चेंडू – उर्विल पटेल – गुजरात विरुद्ध त्रिपुरा, २०२४
३० चेंडू – ख्रिस गेल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स, २०१३
३२ चेंडू – ऋषभ पंत – दिल्ली वि हिमाचल प्रदेश २०१८

उर्विलने वर्षभरापूर्वी याच तारखेला आणखी एक मोठी कामगिरी केली होती. त्याने लिस्ट ए मध्ये दुसरे सर्वात जलद शतक झळकावले होते. विजय हजारे ट्रॉफी सामन्यात त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले होते. या बाबतीत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण अजूनही पहिल्या स्थानावर आहे, ज्याने ४० चेंडूत ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – Bajrang Punia: बजरंग पुनियाला NADA ने ४ वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे नेमकं कारण?

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे भारतीय फलंदाज (चेंडू)

४० चेंडू – युसूफ पठाण – बडोदा विरुद्ध महाराष्ट्र – २००९-१०
४१ चेंडू – उर्विल पटेल – गुजरात विरुद्ध अरुणाचल प्रदेश – २०२३*
४२ चेंडू – अभिषेक शर्मा – पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश – २०२०-२१
५० चेंडू – सूर्यकुमार यादव – मुंबई विरुद्ध पुद्दुचेरी – २०२०-२१

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvil patel smashes fastest t20 hundred in just 28 balls by an indian in syed mushtaq ali trophy breaks rishabh pant record bdg