१७ वर्षीय अमेरिकन धावपटू एरियन नाइटनने २००-मीटर शर्यतीत ८ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसैन बोल्टचा अंडर-२० वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. यूएस ऑलिम्पिक ट्रायल्सच्या २०० मीटर उपांत्य फेरीत एरियनने बोल्टचा १९.९३ सेंकदाचा रेकॉर्ड मोडत १९.८८ सेंकदात शर्यत पूर्ण केली. जानेवारीत एरियन १७ वर्षांचा झाल्यावर प्रोफेशलन धावपटू झाला. त्यामुळे एरियन नाइटन पुढचा उसैन बोल्ट आहे का?, अशी चर्चा सुरु आहे.

यापुर्वी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील १७ वर्षीय धावपटू एरियन नाइटनने एक अकल्पनीय कामगिरी केली होती. अमेरिकन ट्रॅक लीग मीटमध्ये त्याने उसैन बोल्टचा २०० मीटरमधील विक्रम मोडला. इतकेच नव्हे तर २०० मीटर स्पर्धेत २०.११ सेकंदाने जिंकण्यासाठी त्याने थेट ऑलिम्पिकच्या १०० मीटर स्पर्धेतील आवडत्या ट्रेव्हॉन ब्रोमेला सरळ धावायला भाग पाडले. जो उसैन बोल्टच्या रोकॉर्डच्या ०.०२ सेकंद अधिक चांगला आहे.

Story img Loader