जपानच्या नाओमी ओसाकाने आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. नाओमीने उपांत्य फेरीत अमरेकिच्या मॅडीसन कीचा ६-२, ६-४ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ओसाकाची ही पहिलीच वेळ ठरलेली आहे. अंतिम फेरीत ओसाकाचा सामना सेरेना विल्यम्सशी होणार आहे. शनिवारी US Open स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य वाचा – US Open 2018 : सेरेना विल्यम्स अंतिम फेरीत दाखल

आक्रमक खेळी करत ओसाकाने मॅडीसन की या प्रतिस्पर्धी खेळाडूची झुंज मोडून काढली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची कोणत्याही महिला जपानी खेळाडूची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सामन्यात मॅडीसन कीने १३ ब्रेकपॉईंट वाचवत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ओसाकाच्या खेळीपुढे तिचे प्रयत्न तोकडेच पडले. या विजयानंतर ओसाका सेरेना विल्यम्सविरुद्ध कसा खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – US Open 2018 : जोकोव्हिच, कीजची उपांत्य फेरीत धडक