नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडररसारख्या महान खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत क्रोएशियाच्या मरिन चिलीच याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धा स्पर्धेत पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे. चिलीचने अंतिम सामन्यात जपानच्या केई निशीकोरीचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा चिलिच हा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.
एक तास ५४ मिनिटे चाललेल्या सामन्यात अंतिम सामन्यात चिलीचने प्रभावी सर्व्हिसच्या जोरावर निशीकोरीचा पराभव केला. २००१ नंतर चिलिच याचे प्रशिक्षक गोरान इव्हानिसेविच यांच्यानंतर विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचाही मान चिलिच याला मिळाला आहे.
मी माझ्या आयुष्यातला सर्वात उत्कृष्ट खेळ या सामन्यात केला आणि त्याचा मनमुराद आनंदही लुटला, अशी प्रतिक्रिया चिलिच याने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर दिली.
विशेष म्हणजे, २००५ ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेनंतर नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल आणि रॉजर फेडररसारखे दिग्गज खेळाडूंपैकी कोणीही यावेळी अंतिम सामन्यात खेळत नव्हते.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : क्रोएशियाचा मारिन चिलिच पुरुष एकेरीचा विजेता
चिलीचने अंतिम सामन्यात जपानच्या केई निशीकोरीचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा चिलिच हा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.
First published on: 09-09-2014 at 10:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us open marin cilic humbles kei nishikori to win first grand slam see more at httpindianexpress comarticlesportstennisus open marin cilic humbles kei nishikori to win first grand slamstha