भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सानिया आणि ब्रुनो सोरेस यांनी वाय. जे चॅन आणि रॉस हटचीन्स या जोडीचा ७-५, ४-६, १०-७ असा पराभव केला. यानिमित्ताने तिसऱ्यांदा ग्रँडस्लँम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी सानिया मिर्झासमोर आहे. मिश्र दुहेरीप्रमाणे महिला दुहेरी या प्रकारातदेखील सानियाने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत अग्रमानांकन असलेले सानिया आणि ब्रुनो हे पहिल्या सेटमध्ये ५-० असे पिछाडीवर असताना ५-५ अशी बरोबरी करत पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांना ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. पण, तिसऱ्या सेटमध्ये सानिया व ब्रुनो यांनी जोरदार खेळ करत हा सेट १०-७ असा जिंकून सामन्यावर वर्चस्व मिळविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा