अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत १७वे मानांकन असलेल्या स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व सेरेनाने कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-४, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सेरेनाने संपूर्ण सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये सेरेनाला थोडेसे झुंजावे लागले. पण २ गेमच्या फरकाने सेरेनाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनाला प्लिस्कोव्हाकडून कडवी टक्कर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तो सेट तर सेरेनाने अत्यंत सहजतेने जिंकला. या सामन्यात सेरेनाने १३ एसेस मिळवले. तर तुलनेत प्लिस्कोव्हाला केवळ ३ एसेस मिळवता आले. याच मुद्द्यावर सामना सेरेनाचा बाजूने फिरला. कारण पहिल्या आणि दुसऱ्या सर्व्हवर गुण कमावण्याची टक्केवारी दोनही खेळाडूंची समानच होती.

याव्यतिरिक्त, गतविजेती स्लोआन स्टीफन्स हिला पराभवाचा सामना करावा लागला. १९व्या मानांकित सेवास्तोव्हा हिने तिचा ६-२, ६-३ असा सहज पराभव केला.

Story img Loader