अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मी तेलंगणाला व भारताला समर्पित करीत आहे, असे भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झाने सांगितले.
सानियाने प्रथमच ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस याच्या साथीने भाग घेतला होता. या जोडीने अनेक मानांकित खेळाडूंवर मात करीत अजिंक्यपद पटकाविले. या विजेतेपदानंतर सानिया म्हणाली, ‘‘हे विजेतेपद माझ्यासाठी स्वप्नवत कामगिरी आहे. ब्रुनो याच्या सोबत खेळताना मला कोणतीही अडचण आली नाही. माझ्यासाठी हे दोन आठवडे खूप संस्मरणीय आहेत. त्याच्याकडून मला भरपूर शिकायला मिळाले. हे विजेतेपद मी तेलंगणातील सर्व लोकांना अर्पण केले आहे. अर्थात, मी भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमानही आहे.’’

Story img Loader