जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने आपल्या निवृत्तीच्या विचारात बदल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
उसेन बोल्टने २०१६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान, निवृत्ती घेणार असल्याचे गेल्या महिन्यात वक्तव्य केले होते. पण, आता बोल्टचा विचार बदलला आहे. बोल्टने आपल्या निवृत्तीच्या काळात एका वर्षाची वाढ करण्याचा म्हणजेच २०१७ साली निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बोल्ट म्हणाला,  “मी माझ्या निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचारात आहे. माझे चाहते माझ्या निवृत्तीच्या निवृत्तीवर नाराज आहेत याचीही मला कल्पना आहे. त्यांना मला आणखी खेळताना पहावयाचे आहे. त्यामुळे मी माझ्या प्रशिक्षकांशीही याबाबत बोलणी केली. मी आणखी खेळू शकतो त्यांचेही असेच म्हणणे आहे. त्यामुळे निवृत्तीच्या वर्षात आणखी एका वर्षाची वाढ करून २०१७ सालच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेण्याच्या विचारात मी आहे.”
२०२० साली टोकियोमध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेबाबत बोल्टला प्रश्न विचारला असता, “त्याला अजून भरपूर वेळ आहे. पण, पुढील ऑलिम्पिक स्पर्धा जिंकण्याचा माझा मानस आहे. तोपर्यंत माझ्याकडे भरपूर वेळ आहे.” असे बोल्ट म्हणाला. 

Story img Loader