जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले आहे. बोल्टने २०० मीटरची शर्यत १९.५५ सेकंदात पूर्णकरून आपणच जगातील सर्वात वेगवान व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. तर, अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनला याही स्पर्धेत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. गॅटलीनने १९.७४ सेकंदात शर्यत पूर्ण करून बोल्टला कडवी टक्कर दिली.
वेगाचा अनभिषिक्त सम्राट
दरम्यान, या स्पर्धेच्या १०० मीटर श्रेणीत उसेन बोल्ट आणि गॅटलीनमध्ये रविवारी अतितटीची झुंझ पाहायला मिळाली होती. बोल्टने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धेचे जेतेपद कायम राखले होते, तर गॅटलीनने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदकाची कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा