ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदके जिंकणारा उसेन बोल्ट व दोन वेळा ऑलिम्पिक विजेती असलेली शैली अ‍ॅन फ्रेझर यांचा आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. जमैकाच्या संघात त्यांना स्थान देण्यात आले आहे. स्कॉटलंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी जमेकाचे ६८ खेळाडू सहभागी होणार आहेत. बोल्ट व फ्रेझर हे दोघेही फक्त ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भाग घेणार आहेत. ऑलिम्पिक व विश्वविजेते व्हेरोनिका कॅम्पबेल, वॉरेन वेईर यांनाही जमैका संघात स्थान मिळाले आहे. ४०० मीटर अडथळा शर्यतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान मिळविणारा कॅलिसी स्पेन्सर तसेच किम्बर्ले विल्यम्स (तिहेरी उडी), हॅन्सले पार्चमेन्ट (११० मीटर अडथळा) यांनीही जमैकाच्या संघात स्थान मिळविले आहे.

Story img Loader