जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट हा दुखापतीमधून पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, आगामी जागतिक रिले शर्यतीत भाग घेण्यासाठी तो उत्सुक आहे. १०० व २०० मीटर धावण्याचे विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत.
ऑलिम्पिकमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या बोल्टने पायाच्या दुखापतीमुळे गेल्या मोसमातील बहुंताश वेळ विश्रांती घेतली होती. ऑगस्टमध्ये जागतिक मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पुन्हा सोनेरी कामगिरी करण्याचे बोल्टचे ध्येय आहे. तो म्हणाला, ‘‘मी आता शंभर टक्के तंदुरुस्त आहे. आगामी रिले शर्यत ही माझ्या तंदुरुस्तीची चाचणीच असणार आहे. बीजिंग येथील जागतिक मैदानी स्पर्धा होईपर्यंत जास्त ताण न घेता दुखापती टाळण्याचा सल्ला मला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.’’
बोल्टने पुढे सांगितले की, ‘‘मला आता शर्यतींवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. बराच काळ मी स्पर्धात्मक अ‍ॅथलेटिक्सपासून दूर होतो. माझ्या कामगिरीत अधिकाधिक प्रगती करण्यावर माझा भर राहील. सराव व प्रत्यक्ष स्पर्धा यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळेच मी सुरुवातीला खूप वेगाने धाव घेणे मला शक्य होणार नाही. हळूहळू वेग वाढविण्यावर माझा भर राहील. छ’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा