आपल्यातील भन्नाट वेगाने सर्वानाच मंत्रमुग्ध करणाऱ्या जमैकाच्या युसेन बोल्टचा जलवा अर्जेटिनावासीयांना डिसेंबर महिन्यात अनुभवता येणार आहे. ब्युनोस आयर्स येथील ९ डे ज्युलिओ अव्हेन्यू येथे ७ किंवा १३ डिसेंबरला होणाऱ्या एका प्रदर्शनीय शर्यतीत बोल्ट सहभागी होणार आहे. २००८ आणि २०१२ ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदके पटकावणारा बोल्ट या शर्यतीत धावण्यासाठी उत्सुक आहे. तो त्याच्या अन्य तीन साथीदारांसह या शर्यतीत धावणार आहे, असे या शर्यतीचे संयोजक गुलेर्मो मरिन यांनी सांगितले. अनेक ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनी येथे एक प्रदर्शनीय टेनिस सामनाही खेळणार असल्याचे समजते, मात्र त्याविषयी अधिकृत माहिती मरिन यांच्याकडून मिळू शकली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा