लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या उसेन बोल्टने जमैकन अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद शर्यतीत जेतेपद मिळवत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.
बोल्टने ६० मीटरनंतर आघाडी घेत अन्य स्पर्धकांना सहज मागे टाकले आणि ९.९४ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचा सहकारी केमर बेली कोलने ९.९८ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले तर निकेल अ‍ॅशमिडी (९.९९ सेकंद) याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. असाफा पॉवेलने निराशा केली. त्याला हे अंतर पार करण्यास १०.२२ सेकंद वेळ लागला. आता जागतिक स्पर्धेत बोल्टला टायसन गे आणि गतविजेता योहान ब्लेक यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत लेफोर्ड ग्रीनने ४९.२० सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या १०० मीटर शर्यतीत केरॉन स्टुअर्टने शेरोन सिम्पसन हिच्यावर मात करत सुवर्णपदक जिंकले. तिला हे अंतर पार करण्यास १०.९६ सेकंद वेळ लागला. सिम्पसनला ११.०३ सेकंदासह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा