Usman Khawaja double century against Sri Lanka : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार द्विशतक झळकावून इतिहास घडवला आहे. ३८ वर्षीय ख्वाजा श्रीलंकेच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा पहिला कांगारू खेळाडू ठरला आहे. त्याने २९० चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने ही खास कामगिरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियन खेळाडूने १९ वर्षांनंतर आशियामध्ये झळकावले शतक –

तत्पूर्वी, ख्वाजाने कर्णधार स्टीव्हन स्मिथसोबत तिसऱ्या विकेट्ससाठी २६६ धावांची भागीदारी केली. ख्वाजाचे द्विशतक हे १९ वर्षांनंतर आशियात ऑस्ट्रेलियन खेळाडूचे पहिले द्विशतक आहे. यापूर्वी २००६ मध्ये नाईट वॉचमन जेसन गिलेस्पीने बांगलादेशविरुद्ध २०१ धावांची इनिंग खेळली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि ८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

या खेळाडूंनी आशियामध्ये झळकावली आहेत द्विशतकं –

ख्वाजा आणि गिलेस्पी यांच्यापूर्वी केवळ काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ही कामगिरी केली होती. यात मॅथ्यू हेडनच्या नावाचाही समावेश आहे, ज्याने चेन्नईमध्ये भारताविरुद्ध नाबाद २०१ धावा केल्या होत्या. त्याच्या आधी डीन डॉन्सने १९८६ मध्ये मद्रासमध्ये भारताविरुद्ध २१० धावा केल्या होत्या, ग्रेग चॅपलने १९८० मध्ये फैसलाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध २३५ धावा केल्या होत्या, तर मार्क टेलरने १९९८ मध्ये पेशावरमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३३४ धावा केल्या होत्या.

ख्वाजा गॅले येथे द्विशतक झळकावणारा १२वा फलंदाज –

उस्मान ख्वाजाने स्मिथसह २६६ धावांची भागीदारी केली. ही आता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी इतिहासातील दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. कॅनबेरामध्ये ट्रॅव्हिस हेड आणि जो बर्न्सची ३०८ धावांची भागीदारी ही चौथ्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे. तसेच ख्वाजा आता गॅले येथील कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा १२वा फलंदाज ठरला आहे. तसेच या मैदानावर द्विशतक झळकावणारा तो सहावा परदेशी फलंदाज ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usman khawaja becomes first australian to score a test double century in sri lanka at galle vbm