भारत आणि न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना रविवारी लखनऊमध्ये पार पडला. हा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ६ गडी राखून मात केली. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकुमार यादवने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भेटीनंतर सूर्यासोबतचा फोटो शेअर करताना योगी आदित्यनाथ यांनी एक खास संदेशही लिहिला आहे. यानंतर दोघांचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सूर्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. दोघांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट झाली.

योगी आदित्यनाथ यांनी हा फोटो शेअर करत लिहिले, ”लखनऊ येथील अधिकृत निवासस्थानी युवा आणि उत्साही सूर्यकुमार यादव (मिस्टर 360) याच्यासोबत.”

या सामन्यात सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. लखनऊच्या खेळपट्टीवर धावा काढणे किती कठीण होते, याचा अंदाज सूर्यकुमारच्या खेळीवरुन येतो. या सामन्यात सूर्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट गमावत ९९ धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाला १०० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. भारताने १९.५ षटकात ४ विकेट गमावत १०१ धावा करत सामना जिंकला.

हेही वाचा – IND vs AUS: दिनेश कार्तिकने कॉफीच्या पॅकेट्सवरुन मार्नस लाबुशेनची घेतली फिरकी; म्हणाला, ‘अरे मित्रा…’

तसेच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसरा टी-२० सामना बुधवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.