सध्या टाटा स्टील बुद्धिबळ टूर्नामेंट सुरू आहे. या टूर्नामेंटमध्ये घडलेली एक घटना चर्चेचा विषय ठरली आहे. भारताची ग्रँडमास्टर वैशाली हिला उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोडिरबेक याकुबोव्हने सामन्यापूर्वी तिला हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यावरून चर्चेला उधाण आलं होतं. पण आता त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिची माफी मागत हस्तांदोलन का केलं नाही यामागचे कारण सांगितले आहे.
नोदिरबेक याकुबोव्हने भारताची मुलगी आणि ग्रँडमास्टर आर वैशालीशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. नंतर जेव्हा त्याच्यावर टीका झाली तेव्हा त्याने हस्तांदोलन न करण्यामागे धार्मिक कारण असल्याचे सांगितले. मात्र टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. आता उझबेक ग्रँडमास्टरने माफी मागितली असून त्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता असे म्हटले आहे.
चेसबेस इंडियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, याकुबोव्हविरुद्धच्या स्पर्धेच्या चौथ्या फेरीच्या सुरुवातीपूर्वी वैशालीने हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला असल्याचे दिसत आहे, ज्याने सुरुवातीला हाताचा इशारा करून वैशालीला हस्तांदोलन करण्यास नकार दिला आणि नंतर तो खेळण्यासाठी बसला. हा प्रकार पाहून वैशाली देखील थोडी संभ्रमात पडली. २३ वर्षीय याकुबोव्ह जो २०१९ मध्ये ग्रँडमास्टर झाला होता त्याने हा सामना गमावला आणि सध्या आठ फेऱ्यांनंतर चॅलेंजर्स विभागात तीन गुणांवर आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, याकुबोव्हने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने म्हटले की तो, वैशाली आणि तिचा लहान भाऊ आर. तो प्रज्ञानंदचा दर करतो, पण तो धार्मिक कारणांमुळे इतर स्त्रियांना स्पर्श करत नाही. “सामन्यादरम्यान वैशालीबरोबर घडलेली घटना मला सांगायची आहे. महिला आणि भारतीय बुद्धिबळपटूंचा आदर ठेवून, मी सर्वांना सांगू इच्छितो की मी धार्मिक कारणांमुळे इतर महिलांना स्पर्श करत नाही.”
वैशालीनेही उझबेकिस्तानच्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला नाही. आठ फेऱ्यांनंतर भारतीय खेळाडूचे चार गुण झाले असून आणखी पाच फेऱ्या बाकी आहेत. याकुबोव्हने पुढे लिहिले, “मी वैशाली आणि तिचा भावाचा भारतातील एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून आदर करतो. माझ्या वागण्यामुळे जर तिला चुकीचं वाटलं असेल तर मी माफी मागतो.”
![Nodirbek Yakubboev refused to shake hands with Vaishali](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/image_bff2a9.png?w=830)
यापुढे त्याने आपलं म्हणणं सांगताना सविस्तरपणे सांगितलं की, “मी काही अतिरिक्त स्पष्टीकरणे देऊ इच्छितो- १. बुद्धिबळ हराम नाही. मला जे करायला हवे ते मी करतो. २. मी या आधी जे केलं ते चुकीचं होतं (इथे याकुबोव्हने २०२३ मध्ये भारताची बुद्धिबळपटू दिव्या हिला हात मिळवला होता, त्याबद्दल सांगत ते चुकीचे केल्याचे त्याने म्हटले) ३. मी इतरांना विरुद्ध लिंगाच्या लोकांशी हस्तांदोलन करू नये किंवा महिलांना हिजाब किंवा बुरखा घालण्याची सक्ती करत नाही. काय करायचे ते ठरवणे ज्याच त्याचं काम आहे.”
Video for reference. pic.twitter.com/vv4wATXB6O
— Jesse February (@Jesse_Feb) January 26, 2025
याकुबने पुढए सांगितले, “आज (रविवार) मी इरिना बुलमागाला याबद्दल सांगितले. ती देखील या सर्व बाबींशी सहमत होती, पण जेव्हा मी क्रीडादालनात आलो तेव्हा न्यायाधीशांनी मला किमान नमस्कार तरी करावा असे सांगितले. दिव्या आणि वैशालीबरोबरच्या सामन्यात, खेळाआधी मी तिला याबद्दल सांगू शकलो नाही आणि त्यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली.”