व्हॅलेन्सिया आणि इस्पान्योल यांच्यातील लढत ३-३ अशी बरोबरीत सुटल्यामुळे व्हॅलेन्सियाने स्पॅनिश लीग (ला लीगा) फुटबॉल स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर मजल मारण्याची संधी वाया घालवली.
मुबारक वाकासो याने पहिल्या सत्राच्या अखेरीस गोल करून इस्पान्योलचे खाते उघडले. त्यानंतर ५३व्या मिनिटाला सर्जीओ कनालेस याने व्हॅलेन्सियाला बरोबरी साधून दिली. जोआन वेर्डू याने ८२व्या मिनिटाला पुन्हा एकदा इस्पान्योलला आघाडीवर आणले. पण पाच मिनिटांच्या अंतराने जोनस आणि रॉबेटरे सोल्डाडो यांनी गोल करून व्हॅलेन्सियाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना सर्जीओ गार्सियाच्या गोलमुळे इस्पान्योलने सामना बरोबरीत सोडवला.