टीम इंडियाचा फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे नाते अधिकृत झाले आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. ते आपले फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. आज व्हॅलेंटाईन डेला राहुलने इंस्टाग्रामवर अथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकत्र फिरताना दिसत आहेत.
फोटोमध्ये अथिया मिरर सेल्फी घेताना दिसत आहे तर केएल राहुल तिच्यासोबत आहे. राहुलने पोस्टच्या कॅप्शनमध्ये हॅपी व्हॅलेंटाईन डे असे म्हटले आहे. अथिया आयपीएल २०२१ आणि टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये राहुलला चिअर करण्यासाठी यूएईमध्ये होती. केएल राहुल वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० संघाचा भाग होता. मात्र दुखापतीमुळे त्याला तिसऱ्या वनडे आणि टी-२० मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
हेही वाचा – एक पाऊल भविष्याकडे..! BCCI प्रमुख गांगुलीची ‘मोठी’ घोषणा; ट्वीट करत म्हणाला…
अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. तिने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अथियाने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.