भारत वि इंग्लंड तीन सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली, ज्यात भारताने एकतर्फी ३-० असा दणदणीत विजय मिळवला. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ही मालिका टीम इंडियासाठी फार महत्त्वाची होती आणि संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली. या सामन्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी उत्तम खेळी करत पुनरागमन केलं. रोहित शर्माचं शतक, विराट कोहलीचं अर्धशतक, मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी आणि अखेरच्या सामन्यातील केएल राहुलची महत्त्वपूर्ण ४० धावांची खेळी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केएल राहुल मालिकेतील पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात फ्लॉप ठरला. त्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. पण राहुलने अखेरच्या सामन्यात चांगली खेळी केली. यादरम्यान सामन्याचं समालोचन करत असताना भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने त्याच्याबाबत एक वक्तव्य केले.

दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान असतो. यादरम्यान १२ तारखेला भारताचा हा दुसरा वनडे सामना खेळवला जात होता. सुरेश रैना या सामन्यात भारताची फलंदाजी सुरू असताना कॉमेंट्री करत होता. यादरम्यान त्याने केलेल्या वक्तव्याचा व्हीडिओही व्हायरल होत आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध प्रथम फलंदाजी करत होता. तेव्हा अखेरच्या ५ षटकांमध्ये केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरची जोडी मैदानावर होती. यादरम्यान केएल राहुलने डावाच्या ४६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एकच धाव घेतली. यावर टिप्पणी करताना सुरेश रैना म्हणाला, “चौकार-षटकार मारावे लागतील. डेथ ओव्हर्समध्ये आपण फलंदाजी करतोय, दोनवेळा एकेरी धाव घेतली आहे. असंही व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, सिंगल्स चांगले दिसत नाही.” रैनाच्या या विधानावर सहकारी समालोचक दीप दास गुप्ताही हसू लागले आणि तोही जोरात हसायला लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केएल राहुलने या सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने २९ चेंडूंमध्ये १३७.९३ च्या स्ट्राइक रेटने ४० धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला ५० षटकांत ३५६ धावा करण्यात यश आले. या सामन्यात शुबमन गिलनेही शतकी खेळी खेळली. त्याने १०२ चेंडूत ११२ धावा केल्या होत्या. तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरले.

भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकात २१४ धावा करत सर्वबाद झाला. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना १४२ धावांनी जिंकून मालिका ३-० ने आपल्या नावे केली.