जेमी व्हॅर्डीचा दुहेरी धमाका; संडरलँडवर २-० असा सहज विजय; ३३ सामन्यांनंतर ७२ गुणांची कमाई

जेमी व्हॅर्डीने दुसऱ्या सत्रात केलेल्या दोन अप्रतिम गोलच्या जोरावर लिस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत संडरलँडवर २-० असा विजय मिळवून सात गुणांच्या आघाडीसह जेतेपदाच्या उंबरठय़ापर्यंत झेप घेतली आहे. लिस्टरने या विजयासह ३३ सामन्यानंतर ७२ गुणांची कमाई केली आहे, तर हॉटस्पूर ६५ आणि आर्सेनल ५९ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रशिक्षक क्लॉडिओ रॅनिएरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या लिस्टरने ईपीएलमध्ये सलग पाच विजयाची नोंद करत जेतेपदावरील पकड अधिक मजबूत केली आहे. पहिले सत्र गोलशून्य राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात लिस्टरने दमदार पुनरागमन केले. ६६व्या मिनिटाला व्हॅर्डीने क्लबला १-० अशी आघाडी मिळवून दिली. संडरलँड क्लबकडून संघर्षमय खेळ झाला, परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. भरपाई वेळेत व्हॅर्डीने आणखी एक गोल करताना लिस्टरच्या विजयावर २-० असे शिक्कामोर्तब केले.
रॅनिएरी म्हणाले की,‘‘क्लबच्या चाहत्यांनी स्वप्न पाहणे सुरूच ठेवावे, परंतु आम्हाला लक्ष केंद्रित खेळ करणे कायम राखायचे आहे. घरच्या मैदानावर आता आम्हाला दोन खडतर क्लबना सामोरे जायचे आहे. आम्ही अजून काही साध्य केलेले नाही.’’
अन्य निकाल
टोदनम हॉटस्पूर ३ (डेले अली ७० मि., टॉबी अल्डेर्वेरेल्ड ७४ मि., एरिक लॅमेला ७६ मि.) वि. वि. मँचेस्टर युनायटेड
लिव्हरपुल ४ (अल्बेटरे मोरेनो ८ मि., डॅनिएल स्टुरीड ३२ मि., डिव्होक ओरीजी ५० व ६५ मि.) वि. वि. स्टोक सिटी १ (बोजान २२ मि.)

Story img Loader