IND vs ENG ODI Series: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेनंतर आता भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी म्हणून ही वनडे मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारा भारताचा संघच ही वनडे मालिका खेळणार आहे. पण यादरम्यान या वनडे मालिकेच्या संघात भारताचा मिस्ट्री स्पिनर दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरूण चक्रवर्तीचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती आता स्वत: संघाचा खेळाडू शुबमन गिलने दिल्याचे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. त्यामुळे चक्रवर्ती भारताकडून वनडेमध्ये देखील पदार्पण करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वरूण चक्रवर्ती भारताकडून लवकरच भारत-इंग्लंड पहिला वनडे सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ आधीच नागपूरमध्ये दाखल झाला असून सराव करत आहे. पण या संघात भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीदेखील सहभागी झाला आहे. वरूणने टी-२० मालिकेत सर्वाधिक १४ विकेट घेतले आणि त्याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्या या दमदार कामगिरीनंतर वरूणला वनडे संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. वरूण टी-२० मालिकेनंतर वनडे संघात दाखल झाला असून तो संघाबरोबर सरावदेखील करत आहे.

वरुण चक्रवर्ती टीम इंडियाबरोबर सराव करत असल्याचे संकेत देत आहेत की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मोठे बदल करू शकतो. वरुण चक्रवर्ती टीम इंडियासह नेटमध्ये सराव करताना दिसला. नागपूरच्या सराव खेळपट्टीवर तो केएल राहुलला गोलंदाजी करताना समोर आलेल्या फोटो, व्हीडिओमध्ये दिसत आहे. संघातील सर्व खेळाडूंची नजर त्याच्यावर होती. वरुण चक्रवर्ती सध्या टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाचा भाग नसला तरी लवकरच त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

५० षटकांचे के २३ लिस्ट ए सामने खेळूनही, चक्रवर्तीने या सामन्यांमध्ये १९.८ च्या स्ट्राइक रेटने ५९ विकेट्स घेतल्या आहेत. चक्रवर्ती नुकत्याच संपलेल्या देशांतर्गत ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये फिरकीपटूंमध्ये आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ९ धावा देत ५ विकेट होती आणि त्याने १२.१६ च्या सरासरीने १८ विकेट घेतले.

चक्रवर्तीचा सहकारी आणि भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघात त्याचा समावेश केला जाऊ शकतो, असे वक्तव्य केले आहे. अश्विनभारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत वरुणला खेळण्याची संधी मिळू शकते, असं मला वाटतंय.. त्याला थेट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात सामील करणं मला सोपे वाटतं नाहीय.

भारताने आधीच जाहीर केलेल्या त्यांच्या तात्पुरत्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात इतर चार फिरकीपटूंना स्थान दिले आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. परंतु १२ फेब्रुवारीपर्यंत बदल करू शकणाऱ्या संघात आता वरूण चक्रवर्ती रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप यादव यांपैकी एकाची जागा घेणार का हे पाहणे मनोरंजक असेल.

इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun chakaravarthy trains with odi squad in nagpur ahead of india vs england series champions trophy bdg