Varun Chakaravarthy Performance in Vijay Hazare Trophy 2025 : यंदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन १९ फेब्रुवारीपासून केले जाणार असून यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया घरच्या मैदानावर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सामना करणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी सर्वच चुरल लागली आहे. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीने आपल्या दमदार काममगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियात स्थान मिळवण्याचा दावा मजबूत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण चक्रवर्तीचा कहर –

आजपासून विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा प्राथमिक उपांत्यपूर्व सामना राजस्थान आणि तामिळनाडू यांच्यात खेळला जात आहे. वरुण चक्रवर्ती जो आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळतो. पण भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने मोठी कामगिरी केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर वरुण चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी केली. चक्रवर्तीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे राजस्थानचा संघ अवघ्या २६७ धावांत गारद झाला.

अर्ध्या राजस्थान संघाला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता –

मिस्ट्री स्पिनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुण चक्रवर्तीने एकट्याने अर्ध्या राजस्थान संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चक्रवर्तीने १० षटकात ५२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे फिरकी गोलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला मजबूत दावा केला. त्याची कामगिरी अशा वेळी झाली आहे, जेव्हा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेव्यतिरिक्त निवड समिती चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड करतील.

हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज! पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

वनडेमध्ये लवकरच होऊ शकते पदार्पण –

११ जानेवारी रोजी निवडसमिती, प्रशिक्षक आणि कर्णधार रोहित यांची बैठक अपेक्षित आहे. त्यानंतर संघाची घोषणा केली जाऊ शकते. या बैठकीत वरुण चक्रवर्तीच्या नावावरही चर्चा होऊ शकते. कारण कुलदीप यादवच्या फिटनेसवर साशंकता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुणचा फॉर्म पाहिला तर त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत चक्रवर्तीच्या या कामगिरीकडे निवडसमितीला अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. टीम इंडियासाठी १३ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला वरुण वनडेमध्ये पदार्पणाची वाट पाहत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun chakravarthy dominates vijay hazare trophy for champions trophy 2025 squad spot in team india vbm