ICC T20 Rankings Updates Varun Chakravarty gains two spot : वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यामध्ये त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. यानंतर त्याला लॉटरी लागली आणि आता तो इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही खेळताना दिसणार आहे. त्याला अचानक संघात प्रवेश मिळाला. दरम्यान, वरुण चक्रवर्तीने आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. तो टॉप-३ मध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे टॉपवर पोहोचण्या खूप जवळ आहे, हे निश्चित झाले आहे.

वरुण चक्रवर्ती आणि आदिल रशीदचे समान झाले रेटिंग पॉइंट –

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या आदिल रशीदचे नुकसान झाले आहे. तो पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन न खेळताही पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या अकील हुसेनचे रेटिंग पॉइंट ७०७ आहेत, तर आदिल रशीद ७०५ रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीचे पण ७०५ रेटिंग रेटिंग पॉइंटसह आहे. त्यामुळे तो संयुक्त दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीने यावेळच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली आहे.

या गोलंदाजांचे झाले नुकसान –

वरुण चक्रवर्ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याने अनेक गोलंदाजांचे नुकसान झाले आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आता ६९८ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला एक स्थानाचा फटका बसला आहे. ॲडम झाम्पाचीही एका स्थानाने घसरण झाली असून, तो आता ६९४ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.

रवी बिश्नोईनेही घेतली मोठी झेप –

दरम्यान, भारताच्या रवी बिश्नोईनेही क्रमवारीत झेप घेतली आहे. यावेळी त्याला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता ६७१ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा महिषा तिक्षाना ६६५ रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तानचा राशिद खान आठव्या क्रमांकावर आहे. त्याचे ६६४ रेटिंग पॉइंट आहेत. भारताच्या अर्शदीप सिंगला एका स्थानाने नुकसान झाले आहे. तो आता ६५२ च्या रेटिंगसह नवव्या क्रमांकावर घसरला आहे. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचीही यावेळी चार स्थानांनी घसरण झाली असून, तो आता ६४९ च्या रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर घसरला आहे.

Story img Loader