ICC Player of the Month January 2025 : आयसीसीने जानेवारी महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली आहेत. यामध्ये भारताचा वरुण चक्रवर्ती, पाकिस्तानचा नोमान अली आणि वेस्ट इंडिजचा जोमेल वॅरिकन यांना संधी मिळाली आहे. या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी २०२५ मध्ये चांगली कामगिरी केली होती. आता हा पुरस्कार कोणाला मिळणार हे येणारा काळच सांगेल. विशेष म्हणजे ज्या खेळाडूंना नामांकन मिळाले आहे. हे तिघेही फिरकीपटू आहेत.
वरुण चक्रवर्तीची टी-२० मालिकेत दमदार गोलंदाजी –
वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. त्याने टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्यासमोर इंग्लंडचे गोलंदाज टिकू शकले नाहीत आणि बाद झाले. त्याने जानेवारी २०२५ मध्ये चार सामन्यांत ९.४१ च्या आश्चर्यकारक सरासरीने १२ विकेट्स घेतले. राजकोटच्या मैदानावरही त्याने तीन विकेट्स घेतल्या. टी-२० मालिकेतील दमदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
पाकिस्तानसाठी कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा नोमान अली पहिला फिरकी गोलंदाज –
पाकिस्तानने घरच्या भूमीवर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली, जी १-१ अशी बरोबरीत संपली. कसोटी मालिकेत फिरकीपटू नोमान अली पाकिस्तानसाठी सर्वात मोठा हिरो म्हणून उदयास आला. त्यानंतर दोन कसोटी सामन्यात त्याने एकूण १६ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने हॅट्ट्रिक घेतली आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला. आता त्याच्या दमदार खेळामुळे तो आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकण्याचा दावेदार बनला आहे.
जोमेल वॅरिकनने वेस्ट इंडिजला मिळवून दिला विजय –
वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्धचा दुसरा कसोटी सामना १२० धावांनी शानदार पद्धतीने जिंकला. त्यानंतर जोमेल वॅरिकनने वेस्ट इंडिज संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्यामुळेच संघाला पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राखता आली. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकूण ९ विकेट्स घेतल्या. गोलंदाजीसोबतच त्याने आपल्या फलंदाजीतही चमकदार कामगिरी करत महत्त्वाच्या क्षणी ५४ धावांचे योगदान दिले. या कारणास्तव, त्याला सामनावीर आणि मालिकावीरचा पुरस्कार मिळाले.