गुजरातमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. क्रिकेट खेळताना एका सरकारी कर्मचाऱ्याला मैदानातच हृदयविकाराचा झटका आल्याने काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव वसंत राठोड असे आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये खेळाडूची तब्येत अचानक बिघडल्याने खाली बसला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.
क्रिकेट खेळताना मरण पावलेली व्यक्ती एसजीएसटी विभागात वरिष्ठ लिपिक (वसंत राठोड) होते. ही घटना भाडज येथील डेंटल सॉलेजच्या मैदानावर घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातमध्ये १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत ही तिसरी घटना आहे. राठोड फिल्डींग टीममध्ये असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे
जेव्हा तो क्रीझजवळ गोलंदाजी करत होता, तेव्हा तो व्यवस्थित असल्याचा दिसत होता. अचानक त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो चेंडू सोडून तिथेच बसला. पंच आणि सहकारी खेळाडूंनीही तात्काळ त्याच्याकडे धाव घेत मदतीचा इशारा केला.
या काळात वसंत राठोड अस्वस्थ दिसत होता, कधी बसायचे तर कधी झोपायचे. अचानक तो आडवा झाला, त्याच्यासोबत खेळाडूही त्याच्या जवळ उभे होते. वसंत राठोडला सामना सुरू असलेल्या डेंटल कॉलेजमध्ये नेण्यात आले. त्याची ऑक्सिजनची पातळी सतत घसरत राहिल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. वसंत राठोड हा एसजीएसटीच्या युनिट १४ मध्ये कार्यरत होता.