Venkatesh Prasad Chandika Hathurusingha and Chris Silverwood criticize ACC: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० सप्टेंबर रोजी आरके स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका येथे होणार आहे. या सामन्यासाठी एसीसीने शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी खेळण्याच्या परिस्थितीत बदल जाहीर केले आणि राखीव दिवसही जाहीर केला. या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी पीसीबी, एसीसी आणि बीसीसीआयवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर चाहतेही मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसामुळे त्या दिवशी खेळ झाला नाही, तर पहिल्या दिवशी जिथे संपला होता तिथून ११ सप्टेंबरला सामना पुन्हा सुरू होईल. विशेष म्हणजे ही सुविधा फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे चाहते आणि माजी क्रिकेटर एसीसीवर जोरदार टीका करत आहेत. या निर्णयावर टीका करताना एक्स अॅपवर व्यंकटेश प्रसाद यांनी एक पोस्ट केली आहे.

ज्यामध्ये माजी खेळाडू म्हणाला, “फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस आहे, हे खरे असेल तर ते पूर्णपणे निर्लज्जपणा आहे. आशिया चषक आयोजकांनी नियमांची खिल्ली उडवली असून, दोन संघांसाठी वेगवेगळे नियम असलेली स्पर्धा आयोजित करणे अनैतिक आहे. न्यायाच्या नावाखाली हा सामना पहिल्याच दिवशी रद्द केला तर योग्य होईल, दुसऱ्या दिवशी आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि हे निषेधार्ह मनसुबे यशस्वी होऊ शकत नाहीत.”

हेही वाचा – Asia Cup 2023: सुपर-4 फेरीपूर्वी विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूंना केले मार्गदर्शन, VIDEO होतोय व्हायरल

बांगलादेशच्या प्रशिक्षकाचाही निषेध –

यापूर्वी, बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांनी शुक्रवारी सांगितले होते की, केवळ भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणे योग्य नाही. कोलंबोमध्ये पावसाची शक्यता असल्याने त्यांच्या संघालाही राखीव दिवसाचा फायदा घ्यायचा होता. मी इतर कोणत्याही स्पर्धेत असा प्रकार पाहिला नाही. जिथे टूर्नामेंटच्या मध्यावर नियम बदलतात. आशिया कपमध्ये प्रत्येक सहभागी देशाचे प्रतिनिधित्व करणारी एक तांत्रिक समिती असते. त्यांनी हा निर्णय अन्य काही कारणाने घेतला असावा. हे आदर्श नाही आणि आम्हाला पण एक राखीव दिवस हवा आहे.

हेही वाचा – SL vs BAN: आशिया चषक सुपर-4 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश येणार आमनेसामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

श्रीलंकेचे प्रशिक्षकही झाले आश्चर्यचकित –

श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले होते की, जेव्हा मी पहिल्यांदा याबद्दल ऐकले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. पण आम्ही स्पर्धेचे आयोजक नाही. त्यामुळे आम्ही याबद्दल फार काही करू शकत नाही. आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही म्हणून आम्ही तयारी करू आणि मैदानावर आमचे सर्वोत्तम देऊ.

Story img Loader