Venkatesh Prasad Shares Dhoni’s Bike & Cars Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग आणि त्याचे बाईक्सवरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. धोनीकडे कार आणि बाईक्सचे अप्रतिम कलेक्शन आहे. आता माजी भारतीय खेळाडू व्यंकटेश प्रसाद धोनीचे बाईक कलेक्शन पाहून आश्चर्यचकित झाले. व्यंकटेश प्रसाद यांनी धोनीचे हे कलेक्शन पाहिले आणि ते शोरूम असू शकते असे सांगितले. याबाबत खेळाडू व्यंकटेश प्रसादने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्यंकटेश प्रसादने या कलेक्शनचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, “मी एका व्यक्तीमध्ये पाहिलेली सर्वात विलक्षण आवड आहे. काय कलेक्शन आणि काय माणूस आहे एमएसडी. एक महान यश आणि आणखी अविश्वसनीय व्यक्ती. त्याच्या रांचीच्या घरी बाईक आणि कारच्या कलेक्शनची ही एक झलक आहे. या माणसाला आणि त्याची आवड पाहून भारावून गेलो.”

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kanhaiya kumar dissolved all branches of congress nsui unit in maharashtra
कन्हैयाकुमारकडून कारवाईचा बडगा, काँग्रेसच्या ‘या’ विभागाच्या सर्व शाखा बरखास्त
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial
भुवनेश्वरी विरुद्ध अक्षरा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “या अधिपतीला…”
Ghateshwar Shiv Temple shindewadi
पुण्यापासून फक्त ५० किमीवर आहे सुंदर तलावाच्या काठी हे शिवमंदिर, VIDEO एकदा पाहाच
I am happy to be Devendra Fadnavis s elder sister as he becomes Chief Minister again
देवेंद्र लहानपणापासून खोडकर पण…मोठी बहीण स्वाती फडणवीस साठे यांचा आठवणींना उजाळा

या व्हिडीओमध्ये व्यंकटेश प्रसाद यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की, “सर्वप्रथम, रांचीला आल्यानंतर तुम्हाला कसे वाटते? त्याला उत्तर देताना तो म्हणाला, “अद्भुत! नाही, रांचीमध्ये माझी पहिली वेळ नाही. ही माझी चौथी वेळ आहे, पण हे ठिकाण (एमएस धोनीचे बाईक कलेक्शन) वेडे आहे. तुमच्याकडे इतक्या बाईक असू शकत नाहीत जोपर्यंत कोणीतरी त्याबद्दल वेडा होत नाही.”

बाईक शोरूम असू शकते –

माजी भारतीय खेळाडू पुढे म्हणाला, “बाईकचे शोरूम होऊ शकते. मी तुम्हाला सांगतोय की इतर काहीही करण्यासाठी खूप उत्कटतेची गरज असते.” या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीचे बाईक आणि कारचे कलेक्शन पाहता येते. त्यांच्याकडे विंटेजपासून ते लक्झरीपर्यंत गाड्यांची श्रेणी आहे.

हेही वाचा – प्रथितयश त्रिकुटाच्या छटा!; जोकोविचकडून विम्बल्डन विजेत्या अल्कराझची स्तुती; अंतिम लढत गमावल्याची खंत

धोनी आयपीएल २०२४ चा हंगाम खेळणार –

नुकताच ७ जुलै रोजी धोनीने त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी म्हणाला की, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळायचा आहे. आयपीएल २०२३ मध्ये धोनीने १२ डावात १८२.४५ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या आहेत.

Story img Loader