Venkatesh Prasad on Jalaj Saxena: भारतात देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. दुलीप ट्रॉफी २०२३ ही स्पर्धा जवळ आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा संघांचे संघ देखील जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, काही प्रभावशाली खेळाडूंना डावलल्याने दक्षिण विभागाच्या निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने जलज सक्सेनचा संघात समावेश न केल्याबद्दल रणजी ट्रॉफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बाबा इंद्रजित, अष्टपैलू विजय शंकर आणि अष्टपैलू जलज सक्सेना यांचा संघात समावेश न केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. केरळकडून खेळणारा सक्सेना रणजी ट्रॉफी २०२३ च्या एलिट फेरीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. जलजची निवड न होणे हे लज्जास्पद असल्याचे वर्णन करण्यासोबतच भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मजेदार गोष्टी घडत असल्याचेही त्यांनी सांगितले. जलज सक्सेनानीही या प्रकरणावर ट्विट केले आहे. त्याने रणजी ट्रॉफी २०२३ च्या एलिट फेरीत २.७५ च्या इकॉनॉमीने ५० विकेट घेतल्या आहेत.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Border-Gavaskar Trophy What is Monkeygate Controversy in Marathi
Monkeygate Controversy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील प्रसिद्ध मंकीगेट प्रकरण काय होतं? हरभजन-सायमंड्समध्ये त्यावेळी नेमका कसा झाला वाद?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा

यावरुन दिसून येते की रणजी ट्रॉफीला काही महत्त्व नाही –

व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट केले की, “भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मजेदार गोष्टी घडत आहेत. रणजी ट्रॉफीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाची दक्षिण विभागीय संघातही निवड झाली नाही, ही बाब धक्कादायक आहे. यावरुन दिसून येते की रणजी ट्रॉफीला काही महत्त्व नाही. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.”

हेही वाचा – Rohit Sharma: “जर फॉर्म सुधारायचा असेल तर…”; ग्रॅम स्मिथने रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला

जलज सक्सेनाने काय केले ट्विट –

व्यंकटेश प्रसाद पूर्वी जलज सक्सेनानेही ट्विट केले होते. ज्यामध्ये तो म्हणाला की, “रणजी ट्रॉफीमध्ये (एलिट गट) भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये निवडलेला नाही. भारतीय देशांतर्गत इतिहासात असे कधी घडले आहे का? हे तुम्ही तपासू शकता का? फक्त जाणून घ्यायचे आहे कोणाला दोष देत नाही.”

हेही वाचा – Ben Stokes: स्टुअर्ट ब्रॉडच्या हॅटट्रिकसाठी बेन स्टोक्सने लावले विचित्र क्षेत्ररक्षण, फिल्ड प्लेसमेंटचा फोटो होतोय व्हायरल

भारताच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीने होणार आहे. २८ जून ते १६ जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यानंतर देवधर ट्रॉफीचे आयोजन केले जाईल, जी २४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान चालेल. इराणी चषक रणजी चॅम्पियन सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल.