जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात औरंगाबादचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणारे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुधीर जोशी (वय ७४) यांचे सोमवारी रात्री झोपेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी २८ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळात प्रत्येक क्रीडाप्रेमी व्यक्तीला भेटल्यानंतर जिम्नॅस्टिकमध्ये कसे व कोणते धोरणात्मक बदल करावेत, येथपासून ते सुरू असणाऱ्या उपक्रमांवर भरभरून बोलणाऱ्या सुधीर जोशींच्या निधनाने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कबड्डी, बास्केटबॉल क्षेत्रांत खेळाडू घडविताना जिम्नॅस्टिक या प्रकारातील १६ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. मदानाचे प्रेम सुधीर जोशी यांच्या जगण्याचे प्रेरणास्थान होते. त्यांनी क्रीडाक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जोशी यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार १९९० मध्ये देण्यात आला. तसेच २००५ मध्ये त्यांना श्रीगुरुजी पुरस्कार देण्यात आला. या शिवाय त्यांनी विविध क्रीडा समित्यांवर काम केले. धोरणात्मक निर्णयात त्यांचा मोठा सहभाग होता.
ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सुधीर जोशी यांचे निधन
जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात औरंगाबादचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणारे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुधीर जोशी (वय ७४) यांचे सोमवारी रात्री झोपेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
First published on: 26-03-2014 at 02:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vetern sports consultant sudhir joshi passed away