प्रतिस्पर्धी संघाचा आणि फलंदाजांचा अभ्यास करायचो. त्यानुसार स्वत: गोलंदाजी करायचो आणि अन्य गोलंदाजांनाही मार्गदर्शन करायचो. भारताचे कर्णधारपद भूषवण्याची इच्छा होती, पण ते न मिळाल्याची खंत नक्कीच नाही. कारण मला नेतृत्व करण्यापेक्षा सामना जिंकणे अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेताना भारताचे कर्णधारपद न मिळाल्याची खंत नाही, असे मत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानने सांगितले. निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर झहीरशी केलेली खास बातचीत-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
> श्रीरामपूर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट या प्रवासाचे वर्णन कसे करशील?
आतापर्यंतचा क्रिकेटमधला प्रवास ही माझ्यासाठी अद्भुत, अविस्मरणीय अशी आनंदयात्रा होती. क्रिकेटने मला बरेच काही मिळवून दिले. श्रीरामपूर ते मुंबई आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरले. या प्रवासातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. जर ती गोष्ट नसती तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला दिसलो नसतो. भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट होती. जेव्हा सामन्यापूर्वी राष्ट्रगीत म्हटले जायचे, तेव्हा अंगात एक ऊर्जा संचारायची. त्या वेळी ईर्षेने, तडफेने मी मैदानात उतरायचो आणि देशालाजिंकवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचो. काही वेळा देशासाठी मला चांगली कामगिरी करता आली याचा आनंद काही वेगळाच आहे.
> घरच्यांचा पाठिंबा व संस्कार किती महत्त्वाचे ठरले?
मला क्रिकेटची अतिशय आवड होती. सतत क्रिकेटचाच विचार करीत असायचो. त्यामुळे घरच्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि पूर्णपणे खेळण्याचे स्वातंत्र्य दिले. नेहमी माझ्यापाठी ठामपणे उभे राहिले. त्यांच्या संस्कारांमुळे मला बळ मिळाले आणि त्याचा फायदा मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही झाला. त्यांच्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी ठरू शकलो.
> गोलंदाजी या कलेबद्दल तू काय सांगशील?
गोलंदाजी ही एक कला आहे. सातत्याने तुम्ही गोलंदाजीवर, चेंडूवर लक्ष केंद्रित करून त्यामधून बरेच काही शिकायचे असते आणि त्याचा उपयोग पुढील कारकीर्दीमध्ये करायचा असतो.
> तुझ्या मते क्रिकेट म्हणजे काय?
क्रिकेट हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. क्रिकेटने मला आतापर्यंत अवीट आनंद दिला. त्यामुळेच मी एवढी वर्षे भारताकडून क्रिकेट खेळू शकलो. क्रिकेटपेक्षा अन्य कोणत्याही गोष्टीचा आतापर्यंत मी जास्त विचार केला नाही.
> तुझ्यानंतर भारताचे अन्य गोलंदाज ‘रिव्हर्स स्विंग’ करताना दिसत नाहीत, याबद्दल काय वाटते?
‘रिव्हर्स स्विंग’ माझ्याकडून अनाहूतपणे होत गेले. मला ती क्लृप्ती माहिती नव्हती. चेंडू लपवून गोलंदाजी करीत असताना ते माझ्याकडून घडले. माझ्यानंतर भारतातील गोलंदाज रिव्हर्स स्विंग करताना दिसत नाहीत, असे काही जाणकार म्हणतात. पण त्यासाठी आदर्श असे वातावरण आपल्याकडे नाही. माझ्या मते वातावरण आणि खेळपट्टी या गोष्टी गोलंदाजासाठी फार महत्त्वाच्या असतात.
वेगवान गोलंदाजीसाठी आक्रमकपणा किती महत्त्वाचा असतो?
गोलंदाजी करताना काही प्रमाणात आक्रमकपणा महत्त्वाचा असतो. माझ्या मते तेवढा आक्रमकपणा नसला तरी तो मी उसना आणायचो. कारण त्याची गोलंदाजी करताना गरज असायची. आक्रमकता म्हणजे अंगावर धाऊन जाणे नसून ते तुमच्या चेंडूमधून आणि देहबोलीमधून दिसायला हवे.
२०११च्या विश्वविजेतेपदानंतर तू जास्त काळ मैदानावर दिसला नाहीस?
विश्वचषक जिंकणे हा अतुलनीय अनुभव होता, त्याचा एक भाग मला होता आले याचा आनंद आहे. पण त्यानंतर मला दुखापतींनी ग्रासले. स्नायू दुखल्यावर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. पण दुखापतीवर उपचार घेतल्यावर मला संघात स्थान मिळेल, अशी आशा होती. पण ते होऊ शकले नाही.
भारताच्या महान गोलंदाजांपैकी एक. फलंदाजाची मानसिकता अचूक ओळखणारा चतुर गोलंदाज. आव्हाने पेलण्याची क्षमता असणारा खेळाडू. निवृत्तीनंतरच्या नव्या डावासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार
दिमाखदार कारकीर्दीसाठी मनापासून अभिनंदन. तुझ्या योगदानाशिवाय भारतीय संघाला यशोशिखर गाठता आले नसते. जगातल्या हुशार गोलंदाजांपैकी एक. निवृत्तीसह आयुष्यातील नव्या डावाला सुरुवात होते आहे. आगामी उपक्रमांसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार
दिग्गज गोलंदाज आणि तितकाच चांगला माणूस. भविष्यातील योजनांसाठी मनापासून शुभेच्छा. माझ्याप्रमाणे असंख्य युवा खेळाडूंसाठी तू प्रेरणादायी आहेस.
विराट कोहली, भारताचा कर्णधार
संघातला माझा आधारवड. सुसंस्कृत आणि सच्चा माणूस. माझा जणू मोठा भाऊच आणि महान खेळाडू. निवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
सुरेश रैना, भारतीय फलंदाज
स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना किंवा टीव्हीच्या माध्यमातून तुझा प्रत्येक स्पेल अनुभवणे आनंददायी होते. लढवय्या खेळाडू, सच्चा माणूस आणि खूप जवळचा मित्र. निवृत्तीनंतरच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा.
रोहित शर्मा, भारतीय फलंदाज
शानदार कारकीर्दीसाठी मन:पूर्वक अभिनंदन. जगभरातल्या वेगवान गोलंदाजांसाठी योग्य व अचूक आदर्श.
अजिंक्य रहाणे, भारतीय फलंदाज