भारतीय संघाने २८ वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय मिळवल्यावर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. या वेळी एखाद-दुसऱ्या खेळाडूला यशाचे श्रेय न देता त्यांनी विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे.
‘‘लॉर्ड्सवरील विजय थरारक होता. ही फक्त सुरुवात असून अजून बरीच कामे करायची बाकी आहेत. हा युवा संघ असून त्यांना अजून बरेच काही शिकायचे आहे. गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर संघापुढील आव्हान अजून वाढले आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

Story img Loader