लिओनेल मेस्सीने गोल करण्याचा आणखी एक विक्रम नोंदवला असला तरी बार्सिलोनाला स्पॅशिन लीग फुटबॉल स्पर्धेत सेल्टा विगोविरुद्धच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. बार्सिलोनाने ७५ गुणांसह आपली आघाडी कायम राखली आहे. रिअल माद्रिदने २९ सामन्यांत ६२ गुण पटकावून दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
बार्सिलोना संघ अव्वल खेळाडूंविना या सामन्यात उतरला होता, त्यामुळे त्यांना सावध सुरुवात करावी लागली. याचा फायदा उठवत नाक्सो इन्सा याने गोल करून सेल्टा विगोला आघाडीवर आणले. मात्र ख्रिस्तियान टेलोने गोल करून बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मेस्सीच्या गोलमुळे बार्सिलोनाने आघाडी मिळवली. मेस्सीचा हा स्पॅनिश लीगमधील ४३वा गोल ठरला. सलग १९ सामन्यांत गोल झळकावून मेस्सीने आणखी एका विक्रमाची नोंद केली. सलग सामन्यात जवळपास प्रत्येक संघाविरुद्ध गोल करण्याची करामत साधणारा मेस्सी हा स्पॅनिश लीगमधील पहिला खेळाडू ठरला आहे. फॅबियन ओरेलानाच्या क्रॉसवर सेल्टा विगोच्या औबिना याने गोल करून सामना बरोबरीत सोडविला.
मँचेस्टर सिटी, अर्सेनलचे दणक्यात विजय
लंडन : मँचेस्टर सिटी आणि अर्सेनल या संघांनी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. टायटस ब्रॅम्बल याने स्वत:च केलेल्या गोलमुळे सन्डरलँडला मँचेस्टर युनायटेडकडून ०-१ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. मात्र या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने १५ गुणांच्या फरकाने मँचेस्टर सिटीला मागे टाकून जेतेपदाच्या दिशेने भक्कम पायाभरणी केली. मँचेस्टर सिटीने न्यूकॅसलवर ४-० असा विजय मिळवला असला तरी ते ६२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. मँचेस्टर सिटीकडून कार्लोस टेवेझ, डेव्हिड सिल्व्हा, विन्सेन्ट कोम्पानी, जेम्स पर्च यांनी गोल झळकावले. अर्सेनलने रीडिंगचा ४-१ असा पराभव केला. अर्सेनलकडून याओ गेव्र्हिन्हो, सान्ती कझोरिया, ऑलिव्हियर गिरौड, मायकेल अर्टेटा यांनी गोल केले.
मेस्सीचा विक्रम; बार्सिलोनाची बरोबरी
लिओनेल मेस्सीने गोल करण्याचा आणखी एक विक्रम नोंदवला असला तरी बार्सिलोनाला स्पॅशिन लीग फुटबॉल स्पर्धेत सेल्टा विगोविरुद्धच्या सामन्यात २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
First published on: 01-04-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory of messi barsilona in equal