दुसऱ्या सत्रात चार गोल करत रिअल माद्रिदने मलोर्का संघावर ५-२ असा दणदणीत विजय मिळवून स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद केली.
इमिलियो सुए याने सहाव्या मिनिटालाच गोल करून मलोर्काला आघाडी मिळवून दिली होती. १५व्या मिनिटाला गोन्झालो हिग्युएन याने रिअल माद्रिदला बरोबरी साधून दिली. अलेजांड्रो अल्फारोने पुन्हा एकदा मलोर्काला आघाडीवर आणले. ख्रिस्तियानो रोनाल्डोने (५१व्या मिनिटाला) बरोबरी साधून दिल्यानंतर माद्रिदने मागे वळून पाहिले नाही. ल्युका मॉड्रिच (५४व्या मिनिटाला), हिग्युएन (५७व्या मिनिटाला) आणि करीम बेन्झेमा (९०व्या मिनिटाला) यांनी गोल करत माद्रिदच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Story img Loader