अचूक मारा आणि गणेश सतीशच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्रावर चार बळी आणि १२ चेंडू राखत विजय मिळवला.

विदर्भाने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला फलंदाजीसाठी पाचारण केले. विदर्भाच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राला ठरावीक फरकाने धक्के देत त्यांचा डाव १८४ धावांवर संपुष्टात आणला. विदर्भाच्या अक्षय कर्णेवारने चार, तर वेगवान गोलंदाज उमेश यादवने तीन बळी मिळवले.

महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला आश्वासक सुरुवात करता आली नाही. पण सतीशने ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : ४८.२ षटकांत सर्व बाद १८४ (अंकित बावणे ४८; अक्षय कर्णेवार ४/४३, उमेश यादव ३/२४) पराभूत वि. विदर्भ : ४७ षटकांत ६ बाद १८५ (गणेश सतीश नाबाद ७१; एस. काझी ३/४५).

विजयानंतरही मुंबईचे आव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था, हैदराबाद

विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबईने हैदराबादवर सहज विजय मिळवला असला तरी त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईने ‘अ’ गटातील सहा साखळी सामन्यांपैकी चार लढती जिंकल्या. या चार विजयांसह त्यांचे १६ गुण झाले. ‘अ’ गटामध्ये तामिळनाडू आणि पंजाब यांनी २० गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला आहे. सलामीवीर अखिल हेरवाडकर आणि तडफदार फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबईने हैदराबादवर सात विकेट्स आणि ३४ चेंडू राखत सहज विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या धावसंख्येवर मुंबईने चांगलाच अंकुश ठेवला. पण कर्णधार हनुमा विहारीने दमदार खेळी साकारत संघाला २१६ धावा उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विहारीचे शतक या वेळी फक्त पाच धावांनी हुकले. विहारीने ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ९५ धावांची खेळी साकारली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि रोहन राजे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

हैदराबादच्या आव्हान मुंबईने यशस्वीरीत्या पेलले. कर्णधार आदित्य तरे (१२) झटपट बाद झाला. पम त्यानंतर अखिल आणि श्रेयस यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण या दोघांनाही शतक झळकावता आले नाही. अखिलने सात चौकारांच्या जोरावर ८५ धावांची खेळी साकारली, तर श्रेयसने प्रत्येकी चार चौकार आणि षटकार लगावत ८३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद : ५० षटकांत ७ बाद २३४ (हनुमा विहारी ९५; शार्दूल ठाकूर २/३३) पराभूत वि. मुंबई : ४४.२ षटकांत ३ बाद २२० (अखिल हेरवाडकर ८५, श्रेयस अय्यर ८३; मेहंदी हसन १/३६).

महाराष्ट्रावर विजयासह विदर्भ उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : महाराष्ट्रावर विजय मिळवत विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ‘क’ गटामध्ये विदर्भाने अव्वल क्रमांकासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अचूक मारा आणि गणेश सतीशच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्रावर चार बळी राखत विजय मिळवला. विदर्भाने नाणेफेक जिंकत महाराष्ट्राला फलंदाजीसाठी पाचारण केले. विदर्भाच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राला ठरावीक फरकाने धक्के देत त्यांचा डाव १८४ धावांवर संपुष्टात आणला. महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला आश्वासक सुरुवात करता आली नाही. पण सतीशने ७ चौकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पीबीएल : अवध वॉरियर्सची सलामी मुंबई रॉकेटशी

नवी दिल्ली : मुंबईत २ जानेवारीला प्रीमिअर बॅडमिंटन लीगला प्रारंभ होणार असून, सायना नेहवालचा समावेश असलेल्या अवध वॉरियर्सची सलामी मुंबई रॉकेटशी होणार आहे. १७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पध्रेत सहा संघ सहभागी होणार आहेत. दिल्ली, लखनौ, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. पूरग्रस्त परिस्थितीमुळे चेन्नई शहरात सामने होणार नाही. चेन्नई स्मॅशर्सचे सामने लखनौ आणि हैदराबाद येथे होणार आहेत. या स्पध्रेची अंतिम फेरी नवी दिल्लीत होणार आहे.

विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धा

Story img Loader