विदर्भाने इराणी करंडक स्पर्धेच्या अंतिम दिवशी शेष भारतावर पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. शेष भारताने दिलेलं २८० धावांचं आव्हान विदर्भाने समर्थपणे पेललं. अखेरच्या दिवशी ५ गड्यांच्या मोबदल्यात विदर्भाने २६९ धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर दोन्ही कर्णधारांनी परस्पर संमतीने सामना थांबवण्यावर सहमती दर्शवली. या विजयासह विदर्भ आपल्या रणजी आणि इराणी करंडक स्पर्धेचं विजेतेपद कायम राखणारा तिसरा संघ ठरला आहे.

विदर्भाआधी बॉम्बे (आताचा मुंबई) आणि कर्नाटकाने अशी किमया साधली आहे. पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन पहिलं रणजी विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर दुसऱ्या हंगामात सौराष्ट्रावर मात करत विदर्भाने दुसरं रणजी विजेतेपद आपल्या नावावर केलं.

Story img Loader