Video Argentina Goalkeeper Emiliano Martinez Obscene Gesture With Golden Glove Goes Viral: अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने ३६ वर्षानंतर देशाला फुटबॉल विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विशेष करुन अंतिम सामन्यामधील पेनल्टी शूटआऊटमध्ये एमिलियानो मार्टिनेझने केलेल्या कामगिरीमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर एमिलियानो मार्टिनेझ गोल्डन ग्लोव्हज या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आलेल्या एमिलियानो मार्टिनेझने पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंचावरुन खाली उतरण्याआधी एक अश्लील हावभाव केले. एमिलियानो मार्टिनेझने असं नेमकं का केलं याबद्दलची चर्चा सुरु असली तरी त्याचा व्हिडीओ मात्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हायरल फोटो, व्हिडीओंवरुन एमिलियानो मार्टिनेझनेवर टीका केली आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : मेसीने World Cup ची ट्रॉफी उचलताना अंगावर काळा पारदर्शक ‘कोट’ का घातला होता? त्यावरुन का सुरु झालाय वाद?
फिफा आणि कतारमधील सर्वात मोठे अधिकारी मंचावर उपस्थित असतानाच एमिलियानो मार्टिनेझने पुरस्कार म्हणून मिळालेली गोल्डन ग्लोजची ट्रॉफी दोन पायांमध्ये पकडली. लघवी करताना पुरुष उभे राहतात तशा अवस्थेत एमिलियानो मार्टिनेझने ही मुर्ती दोन पायांच्या मध्यभागी पकडून झटका दिल्याप्रमाणे अगदी दात ओठ खाणाऱ्या हावभावांसहीतच मंच सोडला. एमिलियानो मार्टिनेझने केलेली ही कृती लाइट मोड म्हणजेच मस्करीत केलेली असली तरी अनेक तज्ज्ञ, माजी खेळाडू आणि चाहत्यांनी एमिलियानो मार्टिनेझला ही कृती टाळता आली असती, असं म्हटलं आहे.
Video: अर्जेंटिना FIFA World Cup जिंकला अन् तिने मैदानात कॅमेरासमोरच टॉप काढला; Video Viral झाल्यानंतर…
एमिलियानो मार्टिनेझने यंदाचा विश्वचषक हा अर्जेंटिनाच्याच नशिबी होता, असं म्हटलं आहे. ३० वर्षीय एमिलियानो मार्टिनेझने फ्रान्सच्या किंग्स कोमॅनच्या पेनल्टी शूटचा उत्तम प्रकारे बचाव केला. याच क्षणी अर्जेंटिनाने पेनल्टी शूटमध्ये आघाडी मिळवली आणि ती ४-२ च्या फरकाने कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
नक्की पाहा >> Argentina Wins World Cup: मेसीचा खेळ पाहून पंतप्रधान मोदीही झाले प्रभावित; म्हणाले, “हा सामना फुटबॉलच्या इतिहासातील…”
अर्जेटिनाकडे ८०व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मात्र, यानंतर किलियन एम्बापेने आपली गुणवत्ता सिद्ध करताना ९७ सेकंदांत दोन गोल करत फ्रान्सला बरोबरी करून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत मेसी आणि एम्बापेने प्रत्येकी एकेक गोल केल्याने सामना ३-३ असा बरोबरीत आला. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट झाले. यात मेसी, पाव्लो डिबाला, लिआंड्रो पेरेडेस, गोन्झालो मोन्टिएल यांनी गोल करत अर्जेटिनाला विजय मिळवून दिला.