India vs Australia 2nd Test Match Updates: भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रवेश करताच मोठी कामगिरी करेल. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चेतेश्वर पुजारा भारताकडून १०० कसोटी सामने खेळणारा १३वा क्रिकेटपटू ठरणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह भारतीय खेळाडूंनी पुजाराला त्याच्या ऐतिहासिक १००व्या कसोटी सामन्यापूर्वी शुभेच्छा दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या शंभराव्या सामन्याआधी त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली येथील सामन्यात उतरताच पुजारा भारतासाठी शंभर कसोटी सामने खेळणारा तेरावा कसोटीपटू ठरेल. आपल्या १३ वर्षाच्या कारकिर्दीत तो भारताचा एक प्रमुख फलंदाज म्हणून समोर आला. या मोठ्या कारकिर्दीत तो शुक्रवारी मैलाचा दगड पार करेल. तत्पूर्वी बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी क्रिकेट खेळावे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्यांचा या संपूर्ण प्रवासात मोठा पाठिंबा राहिला आहे. मला शंभराव्या सामन्यात खेळताना पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. ते मैदानात उपस्थित असतीलच. मात्र, मला इतक्यातच समाधानी व्हायचे नाही. माझे स्वप्न आहे की, मी भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकावी.”
चेतेश्वर पुजाराने भारतासाठी ९९ सामन्यात ७०२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतके आणि ३४ अर्धशतके झळकावली. नाबाद २०६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरल्यावर पुजारा भारतासाठी १०० किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सामील होईल. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग.
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “सर्वप्रथम मी पुजाराचे देशासाठी १००व्या कसोटी सामन्यात स्थान मिळवल्याबद्दल अभिनंदन करू इच्छितो. ही मोठी उपलब्धी आहे. तुम्ही देशासाठी जे काही केले ते फारसे लोक साध्य करू शकत नाहीत.” राहुल द्रविड म्हणाला, “पुज्जी मी पहिल्यांदाच तुमच्याविरुद्ध खेळलो किंवा पाहिला, तो रणजी सामना होता, ज्यामध्ये तुम्ही धावा केल्या आणि कर्नाटकला पराभूत करण्यात तुमची भूमिका होती. पण गेल्या १० वर्षांत तुम्हाला वाढताना पाहणे खरोखरच खूप छान आहे.”
विराट कोहली म्हणाला, “एका खास खेळाडूसाठी हा खूप खास दिवस आहे. पुझी १००व्या चाचणीबद्दल अभिनंदन. केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही, ज्यांनी तुम्हाला या प्रवासात साथ दिली त्यांच्यासाठी आणि भारतासाठी इतके दिवस खेळणे ही एक मोठी उपलब्धी आहे.” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि १३२ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतासाठी १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंची यादी
सचिन तेंडुलकर – २००
राहुल द्रविड – १६३
व्हीव्हीएस लक्ष्मण – १३४
अनिल कुंबळे – १३२
कपिल देव – १३१
सुनील गावसकर – १२५
दिलीप वेंगसरकर – ११६
सौरव गांगुली – ११३
विराट कोहली – १०५
इशांत शर्मा – १०५
हरभजन सिंग – १०३
वीरेंद्र सेहवाग – १०३