भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून कसोटीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघ कसून तयारी करत आहेत. दोनही संघांकडे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका रंगतदार होणार यात शंकाच नाही. पण याचदरम्यान महाराष्ट्राच्या जनतेला एक नवीन तडाखेबाज फलंदाज पाहायला मिळाला.
राजकारणाच्या खेळपट्टीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा फटकेबाजी केल्याचे जनतेने पहिले आहे. विरोधकांवर टीका करताना तर त्यांची चौफेर फटकेबाजी सुरु असते. पण याच मुख्यमंत्र्यांना खऱ्याखुऱ्या खेळपट्टीवर बॅटिंग करताना पाहायला मिळाले.
नागपूर : ‘होमपीच’वर मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची दमदार फटकेबाजी पाहिलीत का? @LoksattaLivehttps://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/hOItyHbUOV
— LoksattaLive (@LoksattaLive) December 4, 2018
नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात ‘CM चषक’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी क्रिकेटची खेळपट्टी आणि बॅट पाहिल्यावर त्यांना फलंदाजी करण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी नागपुरात आपल्या ‘होमपीच’वर फलंदाजीचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या दिशेला फटके मारत क्रिकेटमध्येपण ‘हम भी किसी से कम नही’ असे दाखवून दिले.