Video FIFA World Cup 2022 Salem Aldawsari Goal Against Argentina: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मधील तिसरा सामन्यामधील दुसऱ्या हाफमध्ये सौदी अरेबियाने फुटबॉलमधील दादा संघ असलेल्या अर्जेंटिनाला जोरदार धक्का देत पाच मिनिटांमध्ये दोन गोल केले. विशेष म्हणजे दुसरा गोल हा पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आल्यानंतर सालीम अल्दवासरीने अगदी भन्नाट शॉट मारत केला. हा गोल इतका भन्नाट होता ही तो पाहून अरबी भाषेत कॉमेन्ट्री करणाराच इतका उत्साहात आला की तो अल्लाह अल्लाह अल्लाह करु लागला. हा गोल आणि या समालोचकाची कॉमेन्ट्री सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हाच सामन्यातील निर्णयाक गोल ठरला आणि सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला २-१ च्या फरकाने पराभूत केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नक्की पाहा >> Video: सामन्याच्या १० व्या मिनिटाला मेस्सीने केलेला अप्रतिम गोल पाहिलात का? FIFA World Cup मध्ये नोंदवला विक्रम

झालं असं की, कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मधील तिसरा सामन्याच्या दहाव्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीने पेनल्टीवर गोल करत सामना १-० वर आणला. यानंतर सौदी अरेबियाच्या संघाने अनेकदा प्रयत्न करुनही त्यांना अर्जेंटिनाची बचावफळी भेदता आली नाही. पहिला हाफमधील खेळ संपल्यानंतरही मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा संघ आघाडीवर होता. दुसऱ्या हाफमधील पहिल्या आठ मिनिटांमध्येच सौदीने केवळ पहिल्या हाफमधील गोलबरोबर बरोबरीच केली नाही तर वचपा काढल्याप्रमाणे एका मागोमाग एक दोन गोल केले.

नक्की वाचा >> …म्हणून FIFA World Cup वर भारताने तसेच कतारला जाणाऱ्या भारतीयांनी बहिष्कार टाकावा; भाजपा प्रवक्त्याची मागणी

सामन्याच्या ५३ व्या मिनिटाला सौदी अरेबियाने अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर पहिल्यांदा अटॅक केला तेव्हा चेंडू गोलपोस्टच्या बारला लागून पुन्हा मैदानात आला. मात्र त्याचवेळी मिडफिल्डर असलेल्या सालीम अल्दवारसीने चेंडूवर नियंत्रण मिळवत अर्जेंटिनाच्या बचाव फळीमधील दोघांना चकवा देत उजव्या पायाने लगावलेला अप्रतिम फटका मारला. चेंडू अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टीन्झच्या हाताला चाटून गेला. मात्र त्याला तो रोखता आला नाही. हा फटका इतका अप्रतिम होता की कॉमेन्ट्री करणारा गोल झाल्यानंतर बराच वेळ देवाचा धावा करत होता. हाच व्हिडीओ आता या गोलबरोबरच या कॉमेन्ट्रीसाठीही व्हायरल होताना दिसतोय.

नक्की वाचा >> FIFA World Cup च्या पहिल्याच दिवशी अंबानींच्या Jio ला मागावी लागली माफी! चाहते म्हणाले, “तुमच्यापेक्षा ‘सोनी’ने…”; जाणून घ्या घडलं काय

तुम्हीच पाहा हा व्हिडीओ… (World Cup 2022 Salem Aldawsari Goal Video)

३६ सामन्यांमध्ये अपराजित राहिल्यानंतर अर्जेंटिनाचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. मेस्सीची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असल्याने हा पराभव नक्कीच अर्जेंटिनाच्या जिव्हारी लागणारा आहे.