भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपूरमध्ये झालेला टी-२० सामना पावसाचा व्यत्य आल्याने आठ-आठ षटकांचा खेळवण्यात आला. मात्र या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ९१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत १-१ ची बरोबर केली. विजयाबरोबरच भारताच्या दृष्टीने या सामन्यातील सर्वाधिक सकारात्मक बाब म्हणजे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा बऱ्याच कालावधीनंतर मैदानात दिसला. विशेष म्हणजे बुमराहने इतक्या कालावधीनंतर मैदानात उतरल्यानंतरही आपला हुकुमी एक्का असणाऱ्या यॉकरने अरॉन फिंचला बाद केलं. मात्र बुराहने टाकलेला हा चेंडू इतका भन्नाट होता की बाद झालेल्या फिंचनेही मैदान सोडण्याआधी टाळ्या वाजवून बुमराचं कौतुक केलं.
नक्की पाहा >> Ind vs Aus: खणखणीत… ‘या’ षटकारासहीत रोहित शर्माची अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी; तुम्ही पाहिलात का हा Video
झालं असं की चार षटकं झाल्यानंतर रोहितने बुमराला गोलंदाजीची संधी दिली. आठ षटकांचाच सामना असल्याने प्रत्येक गोलंदाजाला दोन षटकं टाकण्याची मूभा होती. आपल्या पहिल्याच षटकामध्ये बुमराने भन्नाट गोलंदाजी केली. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराने फिंचला भन्नाट यॉर्कर टाकला. हा चेंडू फिंचला कळलाच नाही. चेंडूने थेट लेग स्टम्प भेदला. फिंचच्या रुपात चौथा गडी तंबूत परतला.
मात्र बुमराने टाकलेला हा चेंडू इतका भन्नाट होता की फिंच बोल्ड होताच नागपूरच्या स्टेडियममध्ये चाहत्यांनी एकच जल्लोष केला. इतकच नाही तर बुमराच्या गोलंदाजीचा दर्जा पाहून फिंचनेच टाळ्या वाजवत गोलंदाजाचं कौतुक केलं. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
सध्या हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी फिंचच्या खिळाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. पाहुयात काही व्हायरल ट्वीट्स…
१)
२)
३)
४)
५)
या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी हैदराबादमध्ये होणार असून हा सामना निर्णायक ठरणार आहे.