भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये आठ षटकांमध्ये ९१ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. हेजलवूडच्या पहिल्याच षटकात दोन खणखणीत षटकार खेचक रोहित शर्माने सर्वाधिक षटकार लगावण्याचा अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला. रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावाणारा खेळाडू ठरला आहे.

नक्की पाहा >> Yorker King Is Back! बुमराहच्या भन्नाट यॉर्करने स्टम्प कधी उडाला फिंचला कळालं नाही; बाद झाल्यानंतर असं काही केलं की… पाहा Video

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिटमॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधारने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये चार षटकार लगावले. यामुळे त्याने मारलेल्या षटकारांची संख्या १७६ इतकी झाली. ही मालिका सुरु होण्यापूर्वी रोहितच्या नावावर १७१ षटकार आणि ३२३ चौकार होते. पहिल्या टी-२० सामन्यात रोहितने एक षटकार मारुन न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टीलच्या १७२ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. दुसऱ्या सामन्यात पहिल्या दोन षटकांमध्ये तीन षटकार लगावत रोहितने सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं षटकार लगावणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीमध्ये पहिलं स्थान रोहितने मिळवलं आहे. रोहित खालोखाल आता १७१ षटकांसहीत न्यूझीलंडच्या गप्टीलचा समावेश होतो.

सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीत रोहित आणि गप्टील वगळल्यास तिसऱ्या क्रमांकावर क्रिस गेल आहे. त्याने ७९ सामन्यांमध्ये १२४ षटकार लगावले आहेत. आकडेवारी पाहिल्यास गेल हा या दोघांपेक्षा बराच मागे आहे. त्या खालोखाल इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचा क्रमांक या सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत लागतो. त्याने १२० षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करणाऱ्या फिंचने या यादीत पाचव्या स्थानी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video ind vs aus rohit sharma becomes batter with maximum number of sixes creates world record in t 20 cricket scsg